(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असतं . इथे कधी जीवघी जीवघेणे स्टंट्स शेअर केले जातात तर कधी ठररक अपघातांचे व्हिडिओ शेअर केले जातात. तसेच इथे काही थक्क करणारे आणि हास्यास्पद व्हिडिओ देखील शेअर होतात, जे युजर्सची मनोरंजन करतात. सध्या मात्र इथे एक अजब आणि धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओतील दृश्ये तुम्ही क्वचितच कधी पाहिली असावीत. यातील जंगलाच्या राजाची दुर्दशा पाहून तुम्हालाही धक्का बसेल. व्हायरल व्हिडिओत नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊयात.
सिंह हा मुळातच एक धोकादायक आणि जीवघेणा प्राणी आहे. तो त्याच्या थरारक शिकारीसाठी ओळखला जातो. त्याच्या साहसी आणि जीवघेण्या वृत्तीमुळेच त्याला जंगलाचा राजा म्हटले जाते. सिंहला फक्त जंगलातील प्राणीच काय तर माणसंही घाबरून असतात. सिंहाच्या शिकारीचे अनेक व्हिडिओज याआधीही सोशल मीडियावर दिसून आले आहेत. यात त्याच्या शिकारीचे भयानक रूप पाहायला मिळते मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही भलतंच घडताना दिसून आले आहे. यात सिंहाचीच शिकार झाल्याचे दिसून आले. जंगलाच्या राजाची ही अवस्था पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला.
काय घडले व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओत, जंगलाचा राजा असलेल्या सिंहाचा जंगली म्हशीने पराभव केल्याचे दिसून आले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सिंह शिकार करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, परंतु रान म्हशीच्या हल्ल्यातून तो वाचू शकत नाही. व्हिडीओमध्ये सिंहावर रानटी म्हशीने हल्ला केल्याचे यात दिसत आहे. सिंहाने प्रयत्न केला, पण म्हशीने त्याला जमिनीवर पाडले आणि त्याच्या शिंगाने त्याच्यावर हल्ला केला. यात म्हैस जंगलाच्या राजाला अक्षरशः तुडवताना दिसून येत आहे. सिंहाची अशी ही हतबल अवस्था पाहून अनेकजण हादरले. सिंहाचे हे रूप कधीही कोणी पाहिले नसल्याचे आता लोक या व्हिडिओला वेगाने शेअर करत आहेत.
Bro was pissed off 😂😂😂 pic.twitter.com/qQTTH8WAPk
— The Instigator (@Am_Blujay) December 23, 2024
हा व्हायरल व्हिडिओ @Am_Blujay नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘भाऊ जास्तच रागावला होता’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जंगलाचा राजा देखील काही वेळा हार मानतो” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कधीकधी जोपर्यंत आपण प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या स्वतःची शक्ती लक्षात येत नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.