(फोटो सौजन्य – X)
सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक वाटेल त्या ठरला जाऊ पाहतात. इथे आपल्या कधी काय दिसेल तर सांगता येत नाही. या व्हायरल व्हिडिओज मधील दृश्ये अनेकदा आपल्या धक्का देणारी ठरतात. आपण कल्पनाही करू शकणार नाहीत अशा गोष्टी इथे घडत असतात. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्ये तुमचा थरकाप उडवल्याशिवाय राहणार नाहीत. यात नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या घटनेत एका गायकाने त्याच्या म्युझिक व्हिडिओमध्ये व्हिज्युअल इफेक्ट्स जोडण्यासाठी स्वतःच्या पँटला चक्क आग लावल्याची घटना घडून आली आहे. मात्र त्याचा हा प्रयत्न सपशेल फेल होतो आणि पुढे त्याला भयंकर अडचणीला सामोरं जावं लागतं. व्हिडिओमध्ये तो त्याच्या पँटला आग लावताना दिसत आहे, जणू काही त्याला आगीने काहीच फरक पडत नाही. तथापि, आग जसजशी तीव्र होत गेली तसतसे गायकाचा संयम तुटू लागला. आगीने त्याच्या पँटचा अधिक भाग व्यापला आणि परिस्थिती त्याच्या नियंत्रणाबाहेर जाऊ लागली. सुरुवातीला शांत दिसणारा हा गायक अखेर आग विझवण्यासाठी धडपड करताना दिसून येतो. आगीचे भीषण रूप बघता त्याला याचा मोठ्या प्रमाणात त्रास झाल्याचे स्पष्ट होते. भयानक स्टंटचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे. लोक यावर आपल्या संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत तर काहींनी त्याच्या या कृत्यावर प्रश्चचिन्ह उपस्थित केला.भयानक स्टंटचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे.
A singer set his pants on fire after refusing to pay for visual effects for his music video pic.twitter.com/YMOmgmzqhE
— NO CONTEXT HUMANS (@HumansNoContext) May 4, 2025
फाटके कपडे अन् फाटकी झोळी! भिकाऱ्याचा थेट वंदे भारतमधून प्रवास; टीसीने तिकीट विचारताच…, Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @HumansNoContext नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 1 मिलियनहुन अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “हे खरं आहे का?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पैसे वाचवताना तो जवळजवळ जीव गमावून बसला होता” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “खरं सांगायचं तर, जर त्याने असं केलं नसतं तर कोणीही त्याच्याबद्दल ऐकलं नसतं”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.