(फोटो सौजन्य – X)
काय घडलं व्हिडिओत?
इराणमधील होर्मुझ हे एक लहान बेट असून त्याच्या अद्भूत भूगर्भीय रचनेमुळे ही घटना घडून आली. पर्शियन आखात आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ स्थित, होर्मुझ बेट त्याच्या रंगीबेरंगी भूगोलासाठी आणि अद्वितीय खडकांच्या रचनेसाठी ओळखले जाते. येथील माती आणि पर्वत लोह ऑक्साईडने समृद्ध आहेत, विशेषतः हेमॅटाइट नावाचे खनिज. हेमॅटाइट (Fe2O3) हा एक नैसर्गिक लोह ऑक्साईड आहे जो पृथ्वीवर लाल रंग निर्माण करतो आणि या खनिजाची उपस्थिती मंगळाच्या पृष्ठभागावर दिसणाऱ्या लाल रंगात देखील योगदान देते. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा या लोहयुक्त पर्वत आणि मातीतून पाणी वाहते आणि हेमॅटाइटचे कण समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाते. यामुळे समुद्राचे पाणी आणि वाळू लाल होते. हा नैसर्गिक रंग बदल केवळ एक हंगामी घटना आहे आणि किनारपट्टीच्या पर्यावरणासाठी हानिकारक नाही. तथापि, सातत्यपूर्ण आणि पुरेसे नियंत्रण न करता, पृष्ठभागावरील मातीची धूप हळूहळू बेटाच्या भू-रचनेत बदल करू शकते, म्हणून पर्यावरण तज्ञ या घटनेचे निरीक्षण करत आहेत.
The scene in Hormuz Island, off Iran’s coast, following heavy rainfall earlier today. pic.twitter.com/Wu6zxDUIkm — Joe Truzman (@JoeTruzman) December 16, 2025
होर्मुझ बेटाचे लाल किनारे
होर्मुझ बेटाची माती मीठाचे डोम्स, ज्वालामुखींचे अवशेष आणि विविध खनिजांनी बनलेले आहेत. याच्या मातीमध्ये ओचर, जिप्सम आणि लोहखनिज आढळले जाते. येथील स्थानिक लोक या खनिजांचा वापर पारंपारिक रंग तयार करण्यासाठी करतात, जे बेटाचे सांस्कृतिक आणि आर्थिक प्रतीक आहे. पावसानंतर हा लाल रंग सर्वत्र पसरतो आणि एक अनोखे दृष्य समोर येते जे पाहून असे वाटते जणू निसर्गाने एक विशाल रंगीत कॅनव्हास तयार केला आहे. हे नैसर्गिक आशचर्य टिपण्यासाठी पर्यटक आणि शास्त्रज्ञ मोठ्या संख्येने इथे गर्दी करतात. ही घटना भूगर्भशास्त्र, हवामान आणि रसायनशास्त्र यांच्यातील एक अद्वितीय संगम दर्शवते. इथे फार सुंदर फोटोज आणि व्हिडिओज काढले जाऊ शकतात जे कुणालाही पहिल्या क्षणी पाहताच आश्चर्यचकित करेल.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






