(फोटो सौजन्य – Instagram)
कल्पना करा, तुम्ही मेट्रो स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत आहात आणि समोरच्या हॉटेलमधून तुम्हाला लाईव्ह रोमान्सचे दृश्य दिसत आहे, तेव्हा तुम्ही काय कराल? सध्या काही असाच प्रकारे मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर घडून आला, ज्यात मेट्रोच्या पायऱ्यांवर उभे असलेले लोक वर चढताच त्यांना अचानक मोफत रोमान्सचा “3D शो” पाहायला मिळाला. आता यानंतर काय घडले असेल असा विचार तुमच्या मनात आला असेल तर चला या घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊया. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ एका व्यक्तीने आपल्या कॅमेरात कैद केला आणि मग तो सोशल मीडियावर शेअर केला.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो OYO संबंधित आहे. ज्यामध्ये एक जोडपे ओयो रूमच्या बाल्कनीत होते, मात्र यावेळी ते आपल्या बाल्कनीचा दरवाजा बंद करायला विसरले ज्यांनंतर त्यांचे खासगी क्षण संपूर्ण जगाला उघड उघड दिसू लागले. बाल्कनीच्या समोरच मेट्रो स्टेशन असल्याकारणाने स्टेशनवर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी या दृश्यांनी मजा घेतली तर काहीजण ते पाहून थक्क झाले.
जोडपे इतके रोमँटिक मूडमध्ये होते की त्यांना कळलेही नाही की त्यांची खोली मेट्रो स्टेशनसमोर आहे आणि बाल्कनीचा दरवाजा उघडा आहे. परिणामी स्टेशनवर उभ्या असलेल्या लोकांना संपूर्ण “लाइव्ह शो” स्पष्टपणे दिसू लागला. व्हिडिओमध्ये स्टेशनवरील एक व्यक्ती ओरडताना दिसत आहे. यावेळी तो व्यक्ती ओरडून म्हणतो, “भाऊ, कृपया गेट बंद करा.” त्याचा आवाज ऐकताच ओयो रूममधील व्यक्तीला आपली चूक उमजते आणि तो धावत जाऊन दरवाजा बंद करतो. त्यानंतर गर्दीत हास्याचा एकच गोंधळ उडतो, काही लोक त्यांचे मोबाईल फोन काढतात आणि व्हिडिओ बनवू लागतात.
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @mahiiii._.17 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. एका युजरने लिहिले, “तो सामाजिक कार्य करतोय भाऊ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भावाने पुण्याचे काम केले आहे, त्याची इज्जत वाचवून, व्हिडिओ बनवला ही एक वेगळी गोष्ट आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “भाऊ एक सामाजिक कार्यकर्ता निघाला”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.