(फोटो सौजन्य – X)
असे म्हटले जाते की मानवाने समुद्राचा फक्त २०% भाग पाहिला आहे. उर्वरित ८०% समुद्र हा मानवी आवाक्याबाहेर आहे. याचाच अर्थ मानवाला अजूनपर्यंत समुद्राविषयी अनेक गोष्टी माहिती नाही. समुद्रतील जीवन हे मानवी जीवनापेक्षा फार वेगळे आणि रहस्यमयी आहे. पाण्यात अनेक वेगवगेळ्या प्रकारचे प्राणी आढळतात. ‘मछली जल की राणी है, जीवन उसका पाणी है, हात लगाओ तो डर जायेगी और बाहर निकालो तो मर जायेगी’ हे गाणं तुम्ही लहानपणी नक्कीच ऐकले असेल. आपल्या मते मासे हे फक्त पाण्यात राहू शकतात मात्र आज आम्ही तुमचा अशा गोष्टीशी खुलासा करून देणार आहोत जो पाहताच तुमच्या पायाखालची जमीन हादरेल.
हवेत उडणारे मासे
आजपर्यंत आपण फक्त मासे पाण्यात पोहताना पाहिले आहेत. पण तुम्ही कधी मासे उडताना पाहिले आहे का? क्वचितच तुम्ही असे कधी ऐकले असेल पण प्रत्यक्षात समुद्रात असेही काही मासे आढळतात, जे चक्क हवेत उडू शकतात. या माशांना “उडणारे मासे” म्हणतात. फ्लाइंग फिश हे समुद्रात आढळणारे एक विशेष प्रजातीचे मासे आहेत, जे प्रत्यक्षात हवेत “उडू” शकतात. त्याचे वैज्ञानिक नाव एक्सोकोएटिडे (Exocoetidae) आहे आणि ते जगभरातील उष्ण सागरी भागात आढळते, जसे की कॅरिबियन समुद्र, हिंद महासागर आणि पॅसिफिक महासागर. हा मासा त्याच्या मोठ्या, पंखांसारख्या पेक्टोरल पंखांचा वापर करून हवेत उडी मारून खूप अंतर “उडू” शकतो.
खरं तर, हा मासा पक्ष्यांसारखे पंख फडफडवून उडत नाही. ते एक प्रकारचे ग्लायडिंग (gliding) करते. जेव्हा त्याला एखाद्या भक्षकापासून (जसे की शार्क किंवा मोठा मासा) पळून जायचे असते तेव्हा हा मासा त्याची शेपटी वेगाने हलवून पाण्यातून उडी मारतो. हा मासा हवेत ५० ते ४०० मीटर अंतर कापू शकतो आणि कधीकधी ६-७ सेकंद हवेत उडू शकतो. तर काही प्रजाती १.२ मीटर (४ फूट) पर्यंत उंच उडू शकतात.
माशा संबंधित काही रोमांचित तथ्ये
हा मासा हवेत उडून भक्षकांपासून वाचतो, परंतु कधीकधी तो चुकून बोटी किंवा जहाजांवर जाऊन पडतो. मच्छीमार सांगतात की असे मासे त्यांच्या बोटींवर पडतात ज्यांना पाहून असं वाटते की जणू आकाशातून माशांचा पाऊस पडत आहे
काही उडणारे मासे एकदा उडून गेल्यावर पाण्याला स्पर्श करू शकतात आणि नंतर पुन्हा उडी मारू शकतात, जणू ते हवेत “उडी मारत” आहेत. यामुळे त्यांचे उड्डाण जास्त लांबते. जपान, बार्बाडोस आणि इंडोनेशियासारख्या अनेक देशांमध्ये उडणारे हे मासे खाल्ले जातात. लोक ते तळून, वाळवून किंवा सूपमध्ये घालून खातात. या माशाला बार्बाडोसचा राष्ट्रीय मासा देखील मानले जाते
Flying fish, these fish are not an easy meal🦈
Những điều thú vị xung quanh ta. #Animalworld pic.twitter.com/QuOlAm5vOB— Thu_Thuy🫶 (@Frjza1221) January 20, 2024
कुठे दिसतो हा मासा?
जर तुम्ही मालदीव, कॅरिबियन किंवा भारतातील काही किनारी भागात उष्ण प्रदेशातील समुद्रकिनारी गेलात तर तुम्हाला हा मासा उडताना दिसेल. हे मासे विशेषतः सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा ते जास्त सक्रिय असतात त्यामुळे याकाळात तुम्हाला ते उडताना पाहता येईल. दरम्यान हा व्हिडिओ @Frjza1221 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.