(फोटो सौजन्य: X)
इंटरनेटवर नेहमीच अनेक मनोरंजक आणि रोमांचक व्हिडिओज व्हायरल होत असतात. शहरातीलच नाही तर जन्गलातीलही अनेक मजेदार दृश्य इथे व्हायरल होत जाते मग ती सिंहांची लढाई असो किंवा हत्तीचा डान्स असो… प्राण्यांचे हे व्हिडिओज लोक आवडीने पाहत असतात आणि म्हणूनच कमी वेळात ते सोशल मीडियावर व्हायरल होतात. आताही एक नवीन व्हिडिओ इथे व्हायरल झाला आहे ज्यात शिकारीचे एक अनोखे आणि भयावह दृश्य दिसून आले. जंगलात शिकार फार सामान्य गोष्ट आहे. इथे दिवसाला अनेकांचे बळी जात असतात मात्र आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये शिकाऱ्याची भयाण रीतीने शिकार झाल्याचे दिसून आले. व्हिडिओमध्ये तरस प्राणी हरणाला मारून त्याला खात असल्याचे दिसते पण त्याची मेजवानी संपेल याआधीच मागून जंगलाचा राजा त्याच्यावर हल्ला करतो आणि यांनतर जे घडते ते भीषण दृश्य ठरते. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये शिकारीचे एक अद्भुत दृश्य दिसून आले ज्यात एकाच वेळी दोन प्राण्यांची थरारक रीतीने शिकार झाल्याचे दिसले. व्हिडिओमध्ये तरस प्राणी पाण्यात एका हरणाचा पकडून त्याला खात असल्याचे दिसते, यावेळी हरणाचे अर्धे शरीर त्याने फाडलेले असते आणि आपल्या शिकारीचा तो आनंद उचलत असतो पण तितक्यात मृत्यू त्याच्या मागे उभा असतो हे त्याला समजत नाही. काही वेळात आपल्याला मागून सिंह हे सर्व दृश्य पाहत असल्याचे समजते आणि क्षणाचाही विलंब न करता तो तरसावर उडी मारत हल्ला करतो. तरसाच्या तोंडात हरीण आणि सिंहाच्या तोंडात तरस… हे सर्वच दृश्य एक नवीन वळण घेते आणि अखेर नेहमीप्रमाणे शिकारीच्या या खेळात जंगलाच्या राजाचा म्हणजेच सिंहाचा विजय होतो. या हल्ल्यात सिंहाने केवळ शिकार हिसकावून घेतली नाही तर जंगलात आपले वर्चस्व सिद्ध केले.
जंगल में आपसे बड़ा एक और शिकारी जरूर होता है। तो कभी भी बहुत अधिक उत्साहित और बहुत अधिक Relaxed नहीं होना चाहिए!! pic.twitter.com/bgFQ1gQYOi — Dr. Sheetal yadav (@Sheetal2242) July 21, 2025
ISKCON च्या रेस्टॉरंटमध्ये तरुणाची हुल्लडबाजी; थेट KFC ची चिकन बकेट काढली अन्…, VIDEO VIRAL
शिकारीचा हा व्हिडिओ @Sheetal2242 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हा AI ने बनवलेला व्हिडिओ आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जंगलातील सर्वात मोठा शिकारी सिंह आहे पण कधीकधी सिंहही अडकतो, ही वेळेची गोष्ट आहे की योग्य वेळी कोण विजयी ठरतो” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “शेवटी जंगलाचा राजा आहे तो”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.