(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मिडियावर दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ बऱ्याचदा आपल्याला थक्क करुन जातात. आताही इथे असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एक गरुड चक्क एका चिमुकल्याला हवेत उचलताना दिसून आला. हे भयानक दृश्य तेथील एका व्यक्तीने आपल्या कैमेरात कैद केले आणि याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर धूमाकूळ घालत आहे. व्हिडिओतील दृश्ये फार भयाण असून ती तुमच्या अंगावर काटा आणू शकतात. व्हिडिओत नक्की काय घडलं ते जाणून घ्या.
काय आहे व्हिडिओत?
मुळातच गरुड हा अवकाशातील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. त्याच्या भयानक शिकारीमुळे त्याला अवकाशातील राक्षस म्हटले जाते. गरुड प्राणी-पक्ष्यांची तर शिकार करतोच मात्र आता तर त्याने माणसांनाही सोडले नाही. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात, एक गरुड वेगाने उडताना दिसतो. हवेला चिरत तो एका दिशेने वेगात जाऊ लागतो. यानंतर काही समजेल तितक्यातच तो तेथील एका चिमुकल्याला पकडतो आणि आपल्या पंजांंमध्ये उचलत त्याला हवेत उडवतो. हे दृश्य काही क्षणातच लोकांचे लक्ष वेधते. यानंतर आपण तिथे एकच गोंधळ उडाल्याचे पाहू शकतो.
घटनेतील हा संपूर्ण प्रकार फार भीषण असून काही जण याच्या सत्यतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. काहींनी याला खरे मानले आहे तर काही याला AI जनरेट व्हिडिओ म्हणत आहे. कोणत्याही प्राण्याने मुलाला असे उचलणे अशक्य आहे. लोकांचा असाही विश्वास आहे की, हा व्हिडिओ काही एडिटिंग टूल किंवा कॉम्प्युटर ग्राफिक्स वापरून बनवला गेला असावा. अनेकदा असे अनेक व्हिडिओज सोशल मिडियावर शेअर होत असतात, जे लोकांना भ्रमात पाडण्याचा प्रयत्न करतात.
हा व्हायरल व्हिडिओ @majidposhtvan नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘तेहरानमध्ये गरुडाचा मुलावर हल्ला’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्समध्ये या धक्कादायक घटनेवर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे, “हे खोटं आहे” तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे, “तूच त्यावर विश्वास ठेवलास” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे भयानक आहे, असा खरंच घडलं का? “.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.