(फोटो सौजन्य – Instagram)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ बऱ्याचदा आपला थक्क करतात, काही व्हिडिओ खळखळून हसवतात तर काही आश्चर्याचदा धक्का देऊन जातात. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्ये तुम्हाला अचंबित करतील. प्राण्यांसंबंधीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत असतात. नुकताच इथे एका कावळ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात कावळा चक्क माणसांप्रमाणे बोलताना दिसून आला.
तुम्ही आजवर पोपटाला माणसांप्रमाणे बोलताना पाहिले असेल मात्र तुम्ही कधी कोणत्या कावळ्याला बोलताना पाहिले आहे का? तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण पालघर जिल्ह्यातील एका गावात माणसांप्रमाणे बोलणारा एक कावळा आढळून आला आहे. या बोलक्या कावळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या गावातील मंगल्या मुकणे यांच्या घरात हा कावळा राहतो. तीन वर्षांपूर्वी त्यांना हा कावळा सापडला, तेव्हा तो काही दिवसांचा होता.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात एका घरातील दृश्य दिसून येते. इथे एक कावळा बाकड्यावर बसून काका, काका अशी हाक मारत होता. हाक देऊनही जेव्हा कोणी उत्तर देत नाही तेव्हा तो काका आहेत का? असा प्रश्न विचारू लागतो. त्याची ही बोली ऐकून सर्वच थक्क झाले आणि वेगाने हा व्हिडिओ शेअर करू लागले. बोलणारा कावळा आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. हा कावळा हुबेहूब माणसांप्रमाणे बोलतो जे पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
बोलणाऱ्या कावळ्याचा हा व्हिडिओ @sanjay.landge.71 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘काका तुमच्या घरात ड्रम आहे बर का जरा जपून’ असे लिहिले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “काका घाबरून बसलाय, आता काय येत नाय बाहेर” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खूप छान अतिशय दुर्लभ प्रकार नशीबवान आहात आपण तुम्ही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.