फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकजण सोशल मीडियावर व्हिडिओ बनवून रातोरात प्रसिद्ध झाले आहेत. यामुळे अनेकजण सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी सतत काही ना काही रील्स बनवत आहेत. स्टंट व्हिडिओ तर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पाहून अनेकांचा थरकाप उडतो. सध्या असाच एक स्टंट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
या व्हिडिओने लोकांना थक्क करून सोडले आहे. एका तरूणाने असा धोकादायक स्टंट केला आहे की, यामुळे त्याचा जीव जाण्याची देखील शक्यता आहे. अनेकदा असे व्हिडिओ विचार करायला भाग पाडतात की हे सगळे कशासाठी फक्त फेमस होण्यासाठी लाईक्स मिळवण्यासाठी. असे वाटते की जीव एवढा स्वस्त झाला आहे का? हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील धास्ती भरेल.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, टेरेसच्या बॉर्डरवर आपले दोन्ही पाय ठेवत तरुण चाकूच्या साहाय्याने खिळ्यावर आपला तोल सांभाळत आहे. यावेळी त्याच्या हातात एक चाकू आहे आणि त्या चाकूची धारदार बाजू खिळ्यावर ठेवून त्यावर शरीराचा बॅलेन्स सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे. इतकेच नाही तर हे करत असताना त्याने पाठीवर जवळपास 20 किलोपेक्षा जास्त वजनाची गोणीही ठेवली आहे. त्याचा मित्र मदत करत आहे. अशाप्रकारे तो हातात चाकू अन् पाठीवर गोणी ठेवून एका खिळ्यावर तोल सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्ण इन्स्टाग्रामवर mr.against_gravity01 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘असा प्रयत्न तुम्ही करू नका.’ अनेकांना हा व्हिडीओ पाहून धक्का बसला आहे. अनेकांनी आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे. एका युजरने म्हटले आहे की, अलीकडे लोकांना जीवनापेक्षा प्रसिद्धी महत्त्वाची आहे. तर दुसऱ्या एकाने लिहिले, ‘असे करू नका भावा, आयुष्य पुन्हा मिळणार नाही.’ सोशल मीडियावर फॉलोअर्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे धोकादायक स्टंट करण्यापेक्षा सुरक्षितता महत्वाची आहे हे लोकांना समजून सांगणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
हे देखील वाचा- पाणी भरण्यावरून महिलांमध्ये जोरदार हाणामारी; एकमेकींवर हंडे फेक, पाहा व्हिडिओ
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.