फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर मेट्रोचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हयरल होत आहे. त्यात दिल्ली मेट्रो तर हमखास असतातच. त्यापैकी तुम्हाला एक किंवा दोन व्हिडिओ नक्कीच सापडतील जे दिल्ली मेट्रो किंवा स्टेशनशी संबंधित आहेत. कधी मेट्रोमध्ये झोपलेल्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होतो तर कधी लोक मेट्रोमध्ये रील काढतानाचा व्हिडिओ व्हायरल होतो.
याशिवाय मारामारीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोन लोक आपापसात भांडताना दिसत आहेत. ज्यामध्ये लोक छोट्या-छोट्या गोष्टींवर एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. दिल्ली मेट्रो सध्या कुस्तीचा आखाडा बनत चालला आहे.
हे देखील वाचा- बाप रे! व्यक्तीने अंतराळातून मारली उडी; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क
नेमकं काय घडलं?
सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेला व्हिडिओ दिल्ली मेट्रोमधील आहे. व्हिडिओमध्ये दोन लोक एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. कधी कधी पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर मात करताना दिसते तर कधी दुसरी व्यक्ती पहिल्या व्यक्तीवर मात करताना दिसते. मेट्रोमध्ये उपस्थित असलेले इतर प्रवासी त्यांना थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत पण कोणीही थांबायला तयार नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हे व्यक्ती एकमेकांना मारत आहे. मेट्रोत प्रचंड गर्दी असल्याने एकमोकांना धक्का लागला त्यामुळे एकाने अचानक दुसऱ्या व्यक्तीला मारायला सुरूवात केली. आणि मग दोघेही स्टेशन येईपर्यंत भांडत राहिले.
व्हायरल व्हिडीओ
Kalesh b/w Two guys inside delhi metro over Push and shove for seat issues
pic.twitter.com/kjTwKU97tG— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) August 7, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ एक्सवर @gharkekalesh अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे की, ‘दिल्ली मेट्रोमध्ये सीटसाठी दोन लोक एकमेकांशी भांडले.’ 22 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, ‘ही त्यांची रोजची दिनचर्या आहे.’ दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘ही दिल्ली मेट्रो नाही तर WWE आहे.’ तिसऱ्या यूजरने लिहिले आहे की, ‘मी 14 वर्षांपासून मेट्रो वापरतोय, माझ्यासमोर असे का कधी होत नाही.’ आणखी एका यूजरने लिहिले की, ‘ते किती सभ्य लोक आहेत.’