फोटो सौजन्य: Social Media
सध्या सोशल मीडियावर कोणते बाबा रातोरात फेमस होतील हे सांगता येत नाही. आपण कित्येक बाबांचे व्हिडिओज रोज बघत असतो. त्यात नेटकरी तर त्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये भन्नाट कमेंट्स टाकत असतात. कधी कुठला बाबा आपल्याला भक्तांच्या मनातलं ओळखताना दिसतो तर कोण पाटीवर काहीतरी लिहून भक्तांना त्यांचे भविष्य सांगतो. काही वेळेस लोकं काही भोंदू बाबांच्या जाळ्यात सुद्धा अडकताना दिसतात.
नुकतेच चालता फॅन थांबवणारे एक बाबा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लड्डू मुत्या स्वामी असे या बाबाचे नाव आहे. सध्या या बाबाचा एक व्हिडिओ खूप ट्रेंड होत आहे. या व्हिडिओमध्ये या बाबाचे भक्त त्याला उचलताना दिसत आहे. यानंतर बाबा चालता फॅन आपल्या हाताने थांबवून त्या भक्तांना आशीर्वाद देत आहेत. दरम्यान या व्हिडिओ नंतर अनेक जणांनी बाबाची नक्कल केली आहे. ही नक्कल बघण्यापूर्वी आपण याला बाबांबद्दल अधिक जाणून घेऊया.
कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यातील लड्डू मुत्या बाबा सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सध्या बाबांच्या दर्शनासाठी लोकांकडून लांबच लांब रांगा लावल्या जात आहे. तसेच ते अचानक चालता फॅन कसे थांबवत आहेत हे चमत्कारिक कारनामा पाहण्यासाठी भाविक बाबांना भेट देत आहे. फॅन चमत्कारिक रित्या थांबवण्यातिरिक्त,बाबा आपल्या भाविकांना प्रवचन सुद्धा देतात.
हे देखील वाचा: अबब! माणसाने चक्क चालू बाईकवर मारल्या पुशअप; लोकांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया
लड्डू बाबा म्हणतात, “समाजात प्रत्येकाने चांगले काम केले पाहिजे. यामुळे आपले जीवन सार्थक होते. जर प्रत्येकजण आनंदी असेल तर आयष्य सुंदर होईल. आयुष्यात कठीण प्रसंग उभे राहिल्यास संपूर्ण विश्वासाने त्याला सामोरे जाण्याचे धैर्य विकसित केले पाहिजे.”
लड्डू मुत्या बाबाचा चालता फॅन थांबवण्याचा व्हिडिओ जसा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे तसं नेटकरी व क्रिएटर्सकडून बाबांची नक्कल करण्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पोस्ट केले जात आहे. या व्हिडिओवर नेटकरी सुद्धा भन्नाट कमेंट्स करताना दिसत आहे.






