(फोटो सौजन्य: Twitter)
सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सिंह आणि वाघ यांच्यातील जोरदार भांडण सुरु असल्याचे समजते. जंगलातील हे दोन भयानक प्राणी जेव्हा आमने-सामने येतात तेव्हा हे दृश्य पाहणे रंजक ठरते मात्र हे चित्र एक मजेदार वळण घेते जेव्हा यात एक कुत्रा एंट्री घेतो. वाघ, सिंह आणि कुत्रा यांच्यातील ही लढत पुढे काय झाले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यात सिंह आणि वाघांमध्ये एक भयंकर युद्ध सुरु असते तितक्याच एक कुत्रा तिथे येतो. पुढच्याच क्षणी आपल्याला दिसेल की, कुत्रा दोघांतील भांडण रोखण्याचा प्रयत्न करत असतो. अक्षरशः वाघाला दातांनी पकडत त्याला लढण्यापासून रोखत असतो. यावेळी सिंह मात्र बाजूला गुपचूप उभा राहून हे दृश्य बघत बसतो. हे संपूर्ण दृश्ये आता युजर्सना आश्चर्यचकित करत आहे. सिंह आणि वाघ एकमेकांशी लढत असून, दोघेही आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पण तेवढ्यात अचानक एक लहान धाडसी कुत्रा मधे उडी मारून दोघांना वेगळे करण्याचा प्रयत्न करतो. हे दृश्य इतके धक्कादायक आहे की इंटरनेटवरील लोक ते पाहून थक्क झाले आहेत.
कुत्रा सिंह आणि वाघाच्या मध्ये येताच तो वाघाचे कान ओढू लागतो, जणू काही म्हणतो, “थांब रे भाऊ, शांत राहा!” आश्चर्याची गोष्ट म्हणजे वाघ त्याच्यावर रागावण्याऐवजी शांत होऊ लागला. सिंहही थोडा मागे हटतो आणि काही वेळाने दोघांमधील भांडण थंडावते. व्हिडिओच्या शेवटी असे दिसते की वाघ आणि सिंह दोघेही कुत्र्याशी सहमत झाले आणि “सॉरी” म्हणत शांत झाले. हे पाहून असे वाटते की कुत्र्याने आपल्या निरागसतेने जंगलाच्या या दोन राजांवर ताबा मिळवला आहे.
Lion vs. Tiger, Dog stops the fight and they apologize after😂 #fights #fightvids #animalfights #explorepage #explore #hoodfights #fightvideos #worldstarfights #gorefight #fighting pic.twitter.com/Q99lFUc33S
— Adam- best fight vids (@itzadam420) February 3, 2023
कसा जायचा संभाजी महाराजांचा दिवस? AI ने तयार केला अनोखा व्हिडिओ; दृश्ये पाहून सुखद धक्काच मिळेल
हा मजेदार व्हिडिओ @itzadam420 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘सिंह विरुद्ध वाघ, कुत्रा भांडण थांबवतो आणि नंतर ते माफी मागतात’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ती त्याची आई आहे, तो तिच्याशी भांडू शकत नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे फार सुंदर आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.