Viral Video : बागेत गवत वाढल्यास ते गवत कापण्यासाठी यंत्र वापरले जाते. मात्र, तुम्ही कधी कुत्र्याला गवत कापताना पाहिलंय का? जरा विचित्र वाटतंय ना? मात्र, या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये (Viral Video) कुत्रा मशीनवर बसून स्टीयरिंग व्हील पकडत आहे. हे पाहून कोणीही थक्क होईल. लॉन मॉवरच्या ड्रायव्हिंग सीटवर कुत्रा बसलेला दिसत आहे.
सोशल मीडियावर कधी-कधी असे व्हिडिओ समोर येतात. काही व्हिडिओ पाहून टचकन डोळ्यात पाणी येतं. त्यातही प्राण्यांचे व्हिडिओ सोशल मीडिया यूजर्सचं (Social media ) लक्ष वेधून घेतात. हे प्राणी जर का काही वेगळं करत असतील तर मग ते चर्चेचा विषय ठरतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Social media video viral ) होत आहे. व्हिडिओमध्ये, कुत्रा लॉन मॉवरवर स्टीअरिंग व्हील धरून चालवत आहे. गवत कापण्यासाठी हा कुत्रा ते मशीन मागे-पुढे फिरवतानाही दिसत आहे.
Is this dog actually mowing the lawn? ?? pic.twitter.com/7kmYUDPleE
— Jaz?️?? (@Jazzie654) April 16, 2023
हा मजेदार व्हिडिओ Jaz (@Jazzie654) या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ट्विटरवर पोस्ट केल्यापासून या व्हिडिओला आतापर्यंत १.७ लाख लाईक्स मिळाले आहेत. सोशल मीडिया यूजर्सनी या व्हिडिओवर
कमेंट्स केल्या आहेत. लॉन मॉवर रिमोट कंट्रोलने चालवला जात असल्याचं वाटत आहे. एका यूजरने लिहिले आहे, “मालकाला लॉन मॉवर रिमोटने नियंत्रित करावं लागले असेल” हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सारे हा व्हिडिओ पाहून थक्क होत आहेत.