(फोटो सौजन्य – Instagram)
समुद्रातील जीवन हे मानवाच्या जीवनाहून फार वेगळे. इथे अथांग समुद्राच्या खोल पाण्यात अनेक अनोखे जीव, मासे राहतात. याची प्रत्येकाची वेगळी अशी ओळख आणि अनोखी खुबी आहे. यातीलच एक मासा म्हणजे व्हेल मासा जो आपल्या विशालकाय शरीरासाठी ओळखला जातो. समुद्रात अनेक प्रकारचे प्राणी आढळतात, त्यापैकी सर्वात मोठा म्हणजे ब्लू व्हेल. समुद्राचा नियम तर प्रत्येकाला ठाऊक आहे इथे मोठे मासे लहान माशांना खातात आणि त्यावर आपला उदरनिर्वाह करतात.
मात्र सध्या सोशल मीडियावर एक अचंबित करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एका लहान माशाने महाकाय व्हेल माशाची शिकार केल्याचे दिसून आले. हा मासा दुसरा तिसरा कोण नसून एक डॉल्फिन आहे, जी आपल्या अद्भुत सौंदर्यासाठी ओळखली जाते. व्हिडिओमध्ये डॉल्फिन ब्लू व्हेलवर हल्ला करताना दिसत आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ इतका धोकादायक आणि धक्कादायक आहे की ज्याने तो पाहिला तो थक्क झाला.व्हिडिओमध्ये, डॉल्फिनचा एक गट एकत्रितपणे काही मिनिटांत ब्लू व्हेलला पूर्णपणे कसे पराभूत करतो हे दिसून येते. या दुर्मिळ दृश्याने लोकांना धक्का बसला आहे, कारण असे दृश्य क्वचितच दिसून येते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही धक्कादायक घटना ७ एप्रिल रोजी पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात घडली. असे सांगितले जात आहे की या दिवशी ६० हून अधिक ऑर्का व्हेल, ज्यांना सामान्यतः किलर व्हेल म्हणून ओळखले जाते, त्यांनी एकत्रितपणे १८ मीटर लांबीच्या पिग्मी ब्लू व्हेलची शिकार केली. अहवालात म्हटले आहे की या किलर व्हेलने प्रथम निळ्या व्हेलचा सतत पाठलाग केला आणि जेव्हा ती थकली आणि कमकुवत झाली तेव्हा त्यांनी सर्वांनी मिळून त्यावर हल्ला केला. या भयानक शिकारीनंतर, समुद्रात व्हेल माशांचा एक कळपही आनंद साजरा करताना दिसला. आम्ही तुम्हाला सांगतो की ओर्का व्हेल ही प्रत्यक्षात समुद्री डॉल्फिनची सर्वात मोठी आणि सर्वात धोकादायक प्रजाती मानली जाते. ते स्वभावाने भक्षक आहेत आणि लांडग्यांसारखे कळप बनवून शिकार करतात. सहसा एका गटात ४० पेक्षा जास्त सदस्य असतात, जे एकत्रितपणे त्यांच्या शिकाऱ्यावर हल्ला चढवतात.
View this post on Instagram
A post shared by WHALE WATCHING TOURS | KILLER WHALE EXPEDITIONS (@naturalistecharters)
बापरे! अचानक कारच्या डिकीतून बाहेर आला हात, पाहून सर्वांचा उडाला थरकाप; नवी मुंबईतील Video Viral
शिकारीचा हा थरार @naturalistecharters नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओतील दृश्ये धक्कादायक असून लोक आता हा व्हिडिओ वेगाने शेअर करत आहेत. लोकांनी कमेंट्स करत या शिकरीवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अविश्वसनीय फुटेज” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आश्चर्यकारक, पण दुःखद. सर्व प्राण्यांना खाण्याची गरज आहे. योग्य जागा, योग्य वेळ, तुम्हाला कधी कोणता अनुभव येईल ते सांगता येत नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.