(फोटो सौजन्य: Twitter)
देशात कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे काम असते. तसेच चोरांना योग्य ती शिक्षा देऊन लोकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्याचेही काम पोलीस करत असतात. महिलांना अधिक सुरक्षा मिळावी यासाठी अनेक महिला पोलीस अधिकारी तैनात असतात. अशात रक्षणकरते पोलीसच जर आपल्या जीवावर उठले तर काय करणार…
सध्या एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात एक पोलीस उपनिरीक्षक भररस्त्यात आपल्याच पत्नीचा मानसिक-शारीरिक छळ करताना दिसून आला. यावेळी हा व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत असून त्याने पोलिसांची वर्दी परिधान केली होती. यावेळी तो आपल्या पत्नीला तिच्या संमतीशिवाय तिला स्पर्श करताना दिसून आला. यावेळी तो तिच्या गळ्याला पकडत तिला आपल्याकडे जोरजोरात खेचताना दिसून आला. हा संपूर्ण प्रकार तेथील एक व्यक्ती आपल्या कॅमेरात कैद करतो आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतो.
माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील कासगंज येथे घडली. उपनिरीक्षक कासगंज पोलिसात काम करतात. त्यांचा हा प्रकार व्हायरल होताच सोशल मीडियावर लोकांनी संताप व्यक्त केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर, हा व्यक्ती पोलीस उपनिरीक्षक असल्याचे उघड झाले आणि तो यावेळी ज्या महिलेचा छळ करत होता ती त्याची पत्नी आहे. या संपूर्ण प्रकारचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी याबाबत दखल घेतली आणि उपनिरीक्षकाला तात्काळ निलंबित केले.
क्या ये सच है @Uppolice ? pic.twitter.com/Azf6GqSXC4
— Dimpi (@Dimpi77806999) February 20, 2025
सोशल मीडिया पर वायरल वीडियो का संज्ञान लेकर सम्बन्धित उ0नि0 को तत्काल प्रभाव से निलम्बित किये जाने एवं विभागीय जाँच एवं कार्यवाही के सम्बन्ध में अपर पुलिस अधीक्षक कासगंज द्वारा दी गई बाइटः- @dgpup @Uppolice @adgzoneagra @rangealigarh pic.twitter.com/F2OLAjSmnt
— KASGANJ POLICE (@kasganjpolice) February 19, 2025
सदर घटनेचा व्हायरल व्हिडिओ @Dimpi77806999 नवाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला हाजारो लोकांनी पाहिले असून पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “समोर जे आहे त्यात तपासाची गरज कुठे आहे? महिलांच्या छेडछाडीचे गुन्हे थेट नोंदवावेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजकाल खोटे व्हिडिओ दाखवून संसदेच्या 100 जागा जिंकता येतात. बनावट व्हिडीओद्वारे अफवा पसरवणे ही काही मोठी गोष्ट नाही, त्यामुळे तपास आवश्यक आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.