आपल्याकडे नेहमीच प्राण्यांना दुय्यम स्थान दिले जाते. त्यांना त्रास देण्यासाठी लोक वाटेल त्या थराला जाऊ पाहतात. मुक्या प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत. आपल्या स्वार्थासाठी निर्दयी माणसं प्राण्यांचा वाटेल तास उपयोग करतात, त्यांचा गैरवापर करतात. मात्र आता हद्दच पार पडली. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधून एक धक्कादायक प्रकारे उघडकीस आला आहे. यात एका वृद्ध व्यक्तीने मादी श्वानासोबत एक विकृत आणि मानवतेला काळिमा फासणार कृत्य केल्याचे समोर येत आहे. नक्की काय आहे प्रकरण? चला सविस्तर जाणून घेऊयात.
या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून आता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रातील नायगाव येथे घडला आहे. एका महिलेने एका बांधकाम साईटच्या शौचालयात मादी श्वानासह एका वयोवृद्ध व्यक्तीला रंगेहाथ पकडल. तिने ही सर्व घटना आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केली आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत असून युजर्स यातील दृश्ये पाहून हादरले आहेत.
काय आहे प्रकरण?
व्हिडिओमध्ये एक 60 वर्षांच्या आसपास दिसणारी व्यक्ती मादी श्वानाला शौचालयात घेऊन जात असल्याचे समजत आहे. मात्र महिलेने वेळीच घटनास्थळी पोहोचून, त्या श्वानाला वाचवले आणि काही भयानक होण्यापासून रोखले. श्वानाला सार्वजनिक शौचालयात नेण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर ती त्या ठिकाणी गेली होती, असा दावा तिने केला आहे. दरम्यान घटनेत सहभाही असणाऱ्या या वृद्धावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता सोशल मीडिया युजर्स करत आहेत.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ @palfoundation नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘नायगावमध्ये एका मादी श्वानाबद्दल अस्वीकार्य क्रूरता – आम्ही न्यायाची मागणी करतो! हे हृदयद्रावक आहे आणि या निष्पाप श्वानावर झालेल्या क्रौर्याचे वर्णन करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत.’ पुढे त्यांनी लिहिले आहे, ‘नायगाव येथील एका गरीब मादी कुत्र्याला सार्वजनिक शौचालयात नेल्याची घटना आमच्यापर्यंत पोहोचली आहे. तिने ज्या क्रौर्याचा सामना केला त्या पातळीला आपण व्यक्त करू शकत नाही. हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे आणि आपण अशा अमानवी वर्तनाच्या विरोधात भूमिका घेणे आवश्यक आहे’
या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत, “त्यांचे चेहरे ब्लर करू नका” दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “देवाचे आभार ही बाई योग्य वेळी आली, देव पाहत आहे, ओम भैरवये नमः” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ओ-माय-गॉड विश्वास बसत नाहीये” अजून एकाने लिहिले आहे “यांना जेलमध्ये टाकून मार द्या”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.