(फोटो सौजन्य: Facebook)
धार्मिक मान्यतेनुसार, एकूण चार युग आहेत जे काळ किंवा विश्वयुगांचे चक्र आहेत. हे चार युग म्हणजे सत्ययुग , त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग! आपण कलियुगात जगत असल्याचे सांगण्यात येते. हे एक असे युग मानले जाते जिथे प्रत्येक व्यक्ती स्वार्थाने आणि खोट्याने भरलेला आहे. कलियुग हे सर्वात भयानक युग मानले जाते. पूर्वीच्या काळात, मुलगा त्याच्या आईसाठी काहीही करण्यासाठी तयार असायचा. मात्र आता हीच मुले आईवडिलांच्या जीवावर उठल्याचे दिसून येते. याची अनेक उदाहरणे याआधीही समोर आली आहेत अशात असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात मुलांनी अक्षरशः आपल्या आईच्या अंत्यसंस्काराची लाज काढली.
सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात मुलाने आईच्या चांदीच्या दागिन्यांसाठी आपल्या आईचा अंत्यसंस्कार विधी थांबवला. मुलाला त्याच्या आईचे चांदीचे दागिने हवे होते. पण ते दागिने त्याच्या भावाकडे होते आणि या प्रकरणावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की दुसऱ्या मुलाने आईचे अंत्यसंस्कार होण्यापासून रोखले. तो त्याच्या आईच्या चितेवर जाऊन बसला. मुलाने असे म्हटले जोपर्यंत त्याला त्याच्या आईचे चांदीचे ब्रेसलेट सापडत नाही तोपर्यंत तो चितेवरून हटणार नाही.
हे प्रकरण राजस्थानमधील कोटपुतली-बहरोड जिल्ह्यातील विराटनगर येथे घडले आहे. जिथे एका वृद्ध महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या दोन्ही मुलांमध्ये चांदीच्या ब्रेसलेटवरून वाद झाला. यात एका मुलाने बांगड्या मिळवण्याच्या हट्टाने आईच्या चितेवर झोपून घेतले. यानंतर, तिथे उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी आणि स्थानिक लोकांनी मुलाला समजावण्याचा प्रयत्न केला पण तो बराच वेळ राजी झाला नाही. तासनतास प्रयत्न केल्यानंतर मुलगा शांत झाला. त्यानंतरच आईचे अंतिम संस्कार करता आले. कलियुगातील या पुत्राने केवळ मानवतेलाच नाही तर आई-मुलाच्या नात्यालाही लाज आणली. दरम्यान या संपूर्ण प्रकारचा व्हिडिओ @Kumar Pintu नावाच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.