(फोटो सौजन्य: Instagram)
नवरात्रीचा उत्साह सर्वत्र असा पसरला आहे की त्याला काही तोडचं नाही. दुर्गा मातेला समर्पित असलेल्या या सणात सर्व लोक एकत्र येऊन मातेला प्रसन्न करण्यासाठी गरबा खेळतात. नवीन कपडे, गाणी, लोकांची गर्दी आणि त्या गर्दीत रंगलेला तो डान्स सर्वांचेच मन प्रफुल्लीत करुन जातो. हेच कारण आहे की, देशभरात गरबा फार उत्साहात आणि आवडीने खेळला जातो. गरब्याचे अनेक व्हिडिओज सोशल मिडियावर व्हायरल होत असतानाच नुकताच इथे एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओची खासियत म्हणजे गरबा खेळण्यासाठी यात एका गाईने वाईल्ड कार्ड एंट्री घेतल्याचे यात दिसून येते. आता गाईच्या एंट्रीने तिथे काय काय धूमाकूळ उडाला ते चला जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक गाय गरब्याच्या ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न करताना दिसून येते. कुणाचंही लक्ष नसताना गाय रिंगणात एंट्री घेते आणि सेकंदाचाही विचार न करता सर्वांभोवती गोल गोल फिरु लागते. तिच्या या धमाकेदार एंट्रीने सर्वत्र एकच धुमाकूळ माजतो आणि लोक गरबा सोडून गाईपासून आपला जीव वाचवू लागतात. मुख्य म्हणजे, गाय गरब्याप्रमाणे फक्त त्या रिंगणातच गोल गोल फिरते जे पाहून तीलाही गरबा खेळण्याचा मोह आवरता आला नाही असे वाटते. व्हिडिओमध्ये लोक घाबरली असली तरी काहीजण या प्रंसगाचाही आनंद लुटत तिच्या पुढे मजा घेऊन पळताना दिसून येतात. हे संपूर्णच दृश्य गरब्याची एक अनोखी मजा दाखवून देते, जिथे आनंद, उत्साह आणि भीती एकत्रितपणे नाचत असते.
सोशल मीडियावर व्हायरल हा व्हिडिओ @sanskar_singhsarva नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हल्ला १००%, नुकसान ०%, आनंद २००%” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आज मी खरोखरच देवी लक्ष्मी पाहिली, जय माता राणी” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आतापर्यंतचा सर्वात सुंदर गरबा, जय धरती माँ जय गौ माता”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.