फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा अशा गोष्टी पाहायला मिळतात ज्या पाहून आश्चर्याचा धक्का बसतो तर अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पाहिल्यावर हसू आवरता येत नाही. भांडण, जुगाड, स्टंट, यांसारखे अनेक व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. पण अनेकदा असे हटक्या गोष्टी आपण पाहतो की, हैराण होऊन जातो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर एका रिक्षाचालकाचा व्हायरल होत आहे.
ऑटो, ट्रक किंवा बसच्या मागे लिहिलेल्या अनेक मजेदार शायरी, कोट्स किंवा अनेक प्रकारच्या जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील. अशा गोष्टी काही क्षणातच लोकांचे लक्ष वेधून घेताता. या ऑटोवरील संदेशाने देखील असेच लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे पाहून तुम्हाला नक्कीच तुमचे हसू आवरता येणार नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच त्याने इन्स्टाग्राम आयडीही दिला आहे.
नेमके काय लिहिले आहे?
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ऑटोच्या मागे मजेशीर ओळी लिहिल्या आहेत. या ओळी वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल की या ऑटो चालकाने आपल्या कामाचा प्रचार केला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा ऑटोचालक कोणते काम करत आहे? ज्याचा तो त्याच्या ऑटोच्या मागून प्रमोशन करत आहे. तर हा ऑटो ड्रायव्हर लोकांच्या दुःखात साथ देण्याचे काम करतो. तुम्ही त्याच्या ऑटोमध्ये बसून आरामात तुमच्या भावना व्यक्त करू शकता आणि यात तो तुम्हाला पूर्ण साथ देईल. गरज पडल्यास तो तुमचा खांदाही बनेल. पण याचे तो पैसे घेईल. ऑटो चालकाने लिहिले आहे की, जर तुम्हाला कोणाशी बोलायचे असेल तर- 500 रुपये, दुःखी कथा सांगण्यासाठी – 1000 रुपये आणि जर मला तुमच्यासोबत रडावे लागले तर ते 2000 रुपये असे ऑटोच्या मागच्या बाजूला लिहिलेले आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @SwathiSiara या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिले असून लाईक केले आहे. तसेच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, भाऊ, भारीच की. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, बहुतेक त्याला देखील कोणत्या तरी गोष्टीचे दुखू असणार आहे, तर तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, जपानमध्ये असे आहे. तर अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ऑटो कोट्स नेहमी अद्वितीय भूमिका बजावतात असे लिहिलेले आहे.