भाऊ नागमणी घेऊनच मानणार! मित्राच्या वरातीत पठ्ठ्याचा खतरनाक नागिन डान्स ; VIDEO पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
संतापजनक! बस डेपोत ST चालकाची अरेरावी; चौकशी करणाऱ्या प्रवाशाला लगावली कानशिलात, Video Viral
भारतीय लग्नांमध्ये नागिन डान्स क्रेझ काही नवीन नाही. डीजेवर नागिन डान्सची धून लावली की अनेकांचे पाय थिरकायला लागतात. या व्हिडिओमध्येही असेच काहीसे दृश्य पाहायला मिळत आहे. नवरदेव घोडीवर आरामात बसलेला असताना त्याच्या एका उत्साही मित्राने थेट घोडीवर चढून असा काही डान्स केला आहे की वऱ्हाड्यांनाही हसू आवरेना.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, नवरदेव घोडीवर दिमाखात बसला आहे. वरातही जोशात पुढे चालली आहे. इतक्यात नवरदेवाचा एक मित्र पुढे योते आणि थेट नवरदेवाच्या घोडीवर पुढे जाऊन बसतो. घोडीवर बसल्यावर पुढच्या क्षणी त्याच्या अंगात भूत शिरते.
आणि तो अतरंगी स्टेप्स करत नागिन डान्स सुरु करतो. त्याचा डान्स पाहून वऱ्हाडी देखील थक्क होतात. तो कधी उजव्या बाजूला, तर कधी डाव्या बाजूला सापासारखे हावभाव करत पडत असतो. त्याचे हा डान्स पाहून वऱ्हाड्यांना प्रचंड हसू सुटते. त्यांचे चांगले मनोरंजन होते. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनाही हसून हसून वेड लागले आहे.
व्हायरल व्हिडिओ
बेचारे गरीब की शादी मैं ही ऐसे नमूने आते हैं😑 pic.twitter.com/F7F1aMeRFH — Rebellious 2.0🕊️ (@RebelliousPari8) May 14, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @RebelliousPari8 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने हा तर नेक्स लेव्हल नागिन डान्स आहे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने भाऊ आता नागमणी घेऊनच मानणार वाटतं? असे म्हटले आहे. तर एकाने एकता कपूराच्या शो मध्ये पाठवा याला असे म्हटले आहे. लोक या तरुणाची चांगली फिरकी घेत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






