फोटो सौजन्य - Social Media
गेल्याच महिन्यात सोशल मीडिया स्टार आन्वी कामदारचा माणगाव तालुक्यातील कुंभे धबधबा येथे पाय घसरून मृत्यू झाला. जवळजवळ ३०० फूट दरीत कोसळून तिने तिचा जीव सोडला. यादरम्यान रेस्क्यू जवानांनी तिला वाचवण्याचे अनेक प्रयत्न केले. पण काम बनले नाही. दुर्घटनेच्या ६ तासांनंतर आन्वीने अखेरचा श्वास घेतला. बरोबर रस्ता नसल्याने आन्वीला वर आणण्यासाठी केलेल्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये जास्त वेळ गेल्याने तिला उपचार लवकर मिळू शकले नाही. उशिरा उपचाराअभावी तिने जीव सोडला. अशा अनेक घटना पावसाळ्यात घडत असतात. तरीही काही जण यातून धडा घ्यायचे सोडून स्टंटबाजी करण्यासाठी अशा ठिकाणी जातात आणि स्वतःच्या जीवाशी हात धुवून बसतात.
साताऱ्यातील बोर्णे घाटातील व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वीच ही घटना घडून आली होती, ज्यात एक युवती सेल्फीच्या नादात १०० फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने, यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी युवतीला सेल्फी अतिशय भारी पडले असल्याचे दिसून येत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये युवतीला वाचवण्यासाठी देवदूतरुपी प्रत्यक्ष एक रेस्क्यू जवान दरीत उतरल्याचे दिसून येत आहे. रश्शीच्या सहाय्याने युवतीला वर आणले जात आहे.
हे सुद्धा वाचा : ‘या’ वृद्ध चाचांचा जोश तरुणांना ही लाजवेल; ‘कयामत’ गाण्यावरचा डान्स होतोय व्हायरल
Pune girl Nasreen Qureshi fell down
> 100 feet gorge at Borne Ghat in Satara
while clicking selfieThankfully,members of Shivendra Raje rescue team rescued her
Please practice responsible tourism friends🙏
Don’t let REEL life END your REAL life🙏pic.twitter.com/Pb9AIbO1kJ
— PallaviCT (@pallavict) August 4, 2024
युवतीच्या शरीरावरील जखमा आणि तिचा तो आक्रोश तिच्या वेदनांची जाणीव करून देत आहे. स्वतःचा जीव धोक्यात टाकून त्या जवानाने युवतीला वर आणण्यासाठी अटोणात प्रयत्न केले आहेत आणि त्यात त्यांना यशही मिळाले आहे. युवती जखमी अवस्थेत जरी असली तरी तिला सुखरूप वर आणले गेले आहे, तसेच तिच्यावर उपचार सुरु आहेत. सदर व्हिडीओ X वर पोस्ट केली गेली असून नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. अनेक नेटकऱ्यांनी युवतीच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे तर काही नेटकऱ्यांनी चांगलेच सुनावले आहे. एक युजर म्हणत आहे कि,”अशा धोक्याच्या ठिकाणी सेल्फी घेण्याची गरज काय आहे?” तर दुसऱ्याने अशा घटनांपासून लोकांनी धडा घेण्याचा संदेश दिला आहे.