(फोटो सौजन्य – X)
आजकाल, सोशल मीडियाच्या या युगात, लोक स्वतःला व्हायरल करण्यासाठी आणि काही शुल्लक व्युजसाठी काहीही करायला बघतात. लोक इंटरनेटच्या आहारी जाऊन अनेक नवनवीन उद्योग करतात आणि सोशल मीडियावर ते शेअर करतात, पण असे करताना बऱ्याचदा लोकांना आपण कुठे उभे आहोत हेही कळत नाही. लोकांची ही बेपर्वा सवय अनेकदा त्यांच्या अंगाशी येऊ शकते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिथे एका मुलीसोबत एक धोकादायक अपघात घडला. व्हिडिओतील दृश्ये इतकी थरारक आहेत की ती पाहताच तुमच्या अंगावर काटा येईल. आता यात नक्की काय आणि कसं घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
या व्हायरल व्हिडिओमध्ये एक मुलगी दिसत आहे. जी समुद्र किनाऱ्यावरील खडकांमध्ये उभी राहून रील बनवताना दिसते. ती मुलगी खडकांमध्ये उभी असते. यावेळी कोणीतरी दूरवरून आपल्या मोबाईलमध्ये मुलीचा व्हिडिओ शूट करत असतो. इथपर्यंत तर सर्वकाही ठीक असतं मात्र खरा खेळ तर यापुढे सुरु होतो. मुलगी गॉगल घालून आपली पोज देतच असते की अचानक तिथे पाण्याची एक जोरदार लाट येते आणि क्षणार्धातच ती मुलगी त्या लाटेत खेचली जाते. मुलगी तोल गमावते आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून जाते. व्हिडिओतील हे संपून दृश्य अंगावर काटा आणते. लोक ते पाहून हादरली आहेत आणि वेगाने या व्हिडिओ शेअर करत आहेत. दरम्यान हा व्हिडिओ नक्की कुठला आणि कधीच आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.
रील बनाने के चलते जिंदगी की रील डिलीट हो गई 🤔🤔 pic.twitter.com/Pj4m7YkL5l
— TANVIR RANGREZ (@virjust18) April 4, 2025
तरुणीचा हा व्हायरल व्हिडिओ @virjust18 नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘रील बनवल्यामुळे, आयुष्याची रील डिलीट झाली’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत 1 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “गेली म्हैस पाण्यात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “व्हिडिओतील ती मुलगी जिवंत आहे का?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.