सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज हास्यापद, थक्क करणाऱ्या तर काही अश्लील आणि थरारक कृत्यांचाही समावेश असतो. हे व्हिडिओज अनेकदा आपल्याला थक्क करून जातात. सध्या असाच एक धकाकदायक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात एक तरुण मेट्रो स्थानकावर लज्जास्पद कृत्य करताना दिसून येत आहे. व्हिडिओ पाहून अनेकजण अचंबित झाले आहेत. तसेच अनेक युजर्स यावर आपला तीव्र संपात व्यक्त करत आहेत.
काय आहे व्हिडिओत?
ही घटना जपानमध्ये घडून आली आहे. इथे प्रवाशांची वर्दळ असलेल्या मेट्रो स्थानकावर एक तरुण सर्वांसमोर लघवी करताना दिसून आला. भारतीय मेट्रोचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यात लोक अनेक विचित्र कृत्य करताना दिसतात मात्र आता ही स्थिती इतर देशातही असल्याचे दिसून येत आहे. जपानसारख्या विकसित देशात असे काही घडणे फार लज्जास्पद आहे. व्हिडिओ पाहून अनेकजण आता थक्क झाले आहेत.
हेदेखील वाचा – धक्कादायक! पाकिस्तानच्या सर्व महिला कुठे आहेत? Viral Video पाहून व्हाल शॉक
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण प्लॅटफॉर्मच्या किनाऱ्यावर उभा राहून मेट्रो ट्रॅकवर लघवी करत आहे. त्याच्या आजुबाजूला तसेच समोरील प्लॅटफॉर्मवर देखील प्रवाशांची गर्दी आहे. मात्र तरीही हा तरुण भान हरपून सर्वांसमोर असे लज्जास्पद कृत्य करताना दिसून येतो. मुख्य म्हणजे, तरुण इथून निघत असताना त्वरित तिथे एक सुरक्षा कर्मचारी येतो आणि तरूणाला पकडून तेथून घेऊन जातो.
To let all Indians know yes shit happens in India but Shit Dont Happen ONLY in India. And somehow other countries are not heaven because media seldom shows you what shit happens around the world.
1) A Japanese man casually peeing in metro station. pic.twitter.com/IvFn9FASud
— Aravind (@aravind) October 15, 2024
हेदेखील वाचा – शेवटी रणरागिणीचं ती! दारू पिऊन छेड काढणाऱ्या कंडक्टरला मुलींनी दिला चोप, चपला काढून बडवलं अन् … Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @aravind नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, “तमाम भारतीयांना कळावे की, “भारतात अस्वच्छता आहे, परंतु अस्वच्छता फक्त भारतातच होत नाही आणि इतर देशही काही स्वर्ग नाहीत. कारण सर्वच देशांमध्ये अस्वच्छता आहे, पण मीडियात तुम्हाला क्वचितच दाखवले जाते. जगभरात अस्वच्छता का आहे? एक जपानी माणूस मेट्रो स्थानकावर आरामात लघवी करत आहे.”
हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जपान ही सर्वात आधुनिक सभ्यता बाळणारा देश आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जपान अतिशय सुरक्षित आणि सभ्य आहे, पण परिपूर्ण नाही”. आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अपवाद….. कुठेही, कधीही आणि कोणाकडूनही होऊ शकतात.”