(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
तुम्ही जर सोशल मीडियावर सक्रिय असाल तर तुमची इथे व्हायरल होणारे व्हिडिओज नक्कीच पाहिले असतील. सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असत, मग तो अपघात असो वा कोणता स्टंट, ती प्रत्येक गोष्ट जी युजर्सचे मनोरंजन करते ती इथे मोठ्या प्रमाणात व्हायरल होते. तुम्ही आजवर इथे थक्क करणारे अनेक व्हिडिओज पाहिले असतील सध्या देखील असाच एक व्हिडिओ इथे वेगाने व्हायरल होत आहे ज्यात एक काका बकरीसह लढताना दिसून येत आहेत. मुख्य म्हणजे, बकरी यावेळी काकांवर कित्येकदा आपल्या शिंगांनी हल्ला करते मात्र तरीही काका पुन्हा त्याचा उर्मीने उभे राहतात आणि बकरीला लढत देतात. व्हिडिओत काय घडले ते जाणून घेऊयात.
सोशल मीडियावर एक अतिशय मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो काका आणि बकरीशी संबंधित आहे. बकरी एक सामान्य प्राणी असली तरी तिचे शिंगे फार धोकादायक असतात, या शिंगांचा प्रहार व्यक्तीला मोठी दुखापत करू शकतो. अशात कोणत्याही प्राण्याला कमी लेखने आपल्या अंगाशी येऊ शकते. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक काका बकरीला आपल्यावर प्रहार करायला सांगताना दिसून येत आहेत. हे दृश्य फार आश्चर्यकारक आणि तितकेच थरारक असे वाटू लागते.
काय आहे व्हायरल व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये, एक काका बकऱ्यासोबत लढताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये काका बकरीला वारंवार मारण्याचा इशारा देत आहेत. यावेळी बकरीही काही मागे हटत नाही आणि आणि त्यांना धडाधड आपली शिंगे मारायला लागते. मुख्य म्हणजे, बकारीची जोरदार शिंग्यांचा प्रहार बसल्यानंतरही काका पुन्हा उठून बकरीला पुन्हा त्यांना मारायला सांगतात. एकंदरीतच ते आपल्या शक्तीचे यावेळी प्रदर्शन करू इच्छित असावेत. व्हिडिओतील ही दृश्ये अनेकांना अचंबित करत आहेत. त्यांची ही लढत तुमच्या अंगावर काटा आणल्याशिवाय राहणार नाही.
हा व्हायरल व्हिडिओ @viral_ka_tadka नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “प्रत्येक टक्करमध्ये काकांची FD दिली” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “याला म्हणतात ताकद”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.