(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक मजेदार आणि रंजक व्हिडिओज शेअर केले जातात. यात दिसून आलेले दृश्य इतके अद्भुत असते की पाहणाऱ्याला ते पाहतच राहावेसे वाटते. इंटरनेटवर फक्त माणसांचेच नाही तर बऱ्याचदा प्राण्यांचीही व्हिडिओज शेअर केले जातात जे पाहणे मनोरंजक ठरते. प्राण्यांचे आयुष्य मानवापेक्षा फार वेगळे असते ज्यामुळे जेव्हाही प्राण्यांच्या आयुष्यासंबंधित व्हिडिओ सोशल मीडिया शेअर होतात तेव्हा युजर्स हे व्हिडिओ आवडीने पाहतात. आताही असाच एक व्हिडिओ इथे व्हायरल झाला आहे ज्यात एक बकरी हेडफोन्स घालून गाणं ऐकताना दिसून आली. हेडफोन्स घालताच बकरी असं काही करते की सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळून राहतात. चला जाणून घेऊया सविस्तर.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात एक बकरी दिसत असून बकरीच्या कानात यावेळी हेडफोन्स घातल्याचे दिसून येते. हेडफोन्सवर यावेळी गाणं सुरु असतं आणि गाणं वाजताच गाण्याच्या तालावर बकरी अशी थिरकू लागते की पाहून सर्वांचेच डोळे विस्फारतात. याआधी कधीही कोणी बकरीला नाचताना पाहिले नाही ज्यामुळे तिला असे गाण्यावर थिरकताना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. गाण्याचा आनंद घेत बारीक अगदी खुशीत गाण्याची मजा लुटते आणि हे दृश्य खरंच पाहण्यासारखे होते. तथापि हा व्हिडिओ नक्की कुठला आहे अद्याप स्पष्ट झाले नसून याचा व्हिडिओ मात्र आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. लोक हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत असून मोठ्या प्रमाणात याला शेअर केले जात आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @viral_india.official नावाच्या युट्युब अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरे व्वा, हे तर भारीच आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बकरीला गाणं जरा जास्तच आवडलं वाटत” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “बकरीची तर फुल ऑन मजा सुरु आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.