(फोटो सौजन्य: Instagram)
सिंह हा जंगलातील सर्वात खतरनाक प्राणी आहे. संपूर्ण जंगलात त्याची दहशत पसरलेली असते. हत्तीसारखा बलाढ्य प्राणीही सिंहाला दचकून असतो. हेच कारण आहे की त्याला जंगलाच्या राजाची उपमा देण्यात आली आहे. सिंहाची दहशत फक्त जंगलातच नाही तर शहरी भागातही तितकीच पाहायला मिळते. अशातच आता सिंहाचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे ज्यात तो एका ग्रोसरी स्टोरमध्ये मांसाचे तुकडे पळवताना दिसून आला. जंगलाच्या राजाची ही चोरी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आणि याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. चला यात काय घडले ते जाणून घेऊया.
माकडाने पर्यटकाकडून लुटला ५०० रुपयांच्या नोटांचा गठ्ठा अन्…; तुम्हीच पाहा पुढे काय केलं, Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक सिंह ग्रोसरी स्टोरमध्ये घुसून मांस खाताना दिसून आला. सिंहाची ही एंट्री सर्वांनाच थक्क करणारी आणि घाबरवणारी ठरली. त्याला पाहताच ग्रोसरी स्टोरमध्ये ग्राहकांची तारांबळ उडाली आणि लोक सैरावैरा होऊन इतके तिकडे पळू लागले. सिंह मात्र बिनधास्तपणे दुकानात प्रवेश करत फ्रिजजवळ जातो आणि त्यातील मांसाचे तुकडे काढून खायला सुरुवात करतो. यावेळी आजूबाजूला ग्राहक आपला जीव वाचवण्यासाठी तेथून पळ काढत असल्याचेही व्हिडिओत दिसून आले. दरम्यान हा सिंह इथे कसा आणि कुठून आला याची माहिती अद्याप हाती आली नाही.
ही घटना आपल्याला पुन्हा एकदा याची जाणीव करून देते की जंगलांची तोडफोड निसर्गावर किती परिणाम करत आहे. जंगलाचे राजे आता भूक भागवायला शहर गाठू लागले आहेत. ही घटना दक्षिण आफ्रिकेतील एका ग्रोसरी स्टोरमध्ये घडल्याची माहिती आहे. घटनेचा व्हिडिओ @wildtrails.in नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर कारण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्युज मिळाल्या असून अनेक युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तो स्वर्गात आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला आशा आहे की कोणीतरी त्याला प्लास्टिक काढायला मदत केली असेल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.