माकडाने पर्यटकाकडून लुटला ५०० रुपयांच्या नोटांचा गठ्ठा अन्...; तुम्हीच पाहा पुढे काय केलं, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Viral News Marathi : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तर कधी भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तसेच प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. यामध्ये माकडांचे तर अनेक मजेशीर मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी माकड लोकांचे फोन चोरुन नेते, तर कधी एखादी गोष्ट चोरल्यानंतर त्याच्या बदल्यात मोलतोल करणार माकड पाहायला मिळते.
सध्या एक असाच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका माकडाने पर्यटकाच्या ५०० रुपयांच्या नोटांचा गठ्ठा लुटला आहे. त्यानंतर त्याने असे काही केले आहे की, पाहून हसून हसून लोटपोट व्हाल. कर्नाटकमध्ये ही घटना घडली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक माकड झाडावर बसले आहे. त्याच्या हातात ५०० रुपयांच्या नोटांचा एक गठ्ठा आहे. माकड एक एक नोट काढून खाली फेकताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे माकडाजवळ एक नव्हे दोन तीन नोटांचे बंडल दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
உனக்கு தான் இது ரூபாய், எனக்கு இது விளையாட்டு பேப்பர் – குரங்கின் சேட்டைகள் 🐒
கொடைக்கானல் குணா குகை – கர்நாடகவை சேர்ந்த சுற்றுலாப் பயணியின் 500 ரூபாய் கட்டை எடுத்து ஒவ்வொரு நோட்டாக (பேப்பராக) வீசும் காட்சிகள் வைரல். pic.twitter.com/1TCyFZL4hQ
— Kᴀʙᴇᴇʀ – தக்கலை கபீர் (@Autokabeer) June 16, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Autokabeer या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने माकडाने जॅकपॉट मारला असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने त्याला आमचा पगार खर्च करावा लागला असे म्हटले आहे. परंतु माकडाकडून एवढे पैसे नेमके कुठून आले याबाबत अद्याप ठोस माहिती नाही. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, माकडाने एका पर्यटकाकडून पैसे लुटले असल्याचे सांगतिले जात आहे. ही व्हिडिओ सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.