(फोटो सौजन्य: X)
जंगलाचा राजा म्हणून सिंहाची ओळख आहे. आपल्या बलाढ्य शक्तीने तो मोठमोठ्या प्राण्यांचीही शिकार करतो. त्याच्या ताकदीपुढे जंगलाचा प्रत्येत जीव नतमस्तक होतो आणि म्हणूनच एक शक्तीशाली प्राणी म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. अशातच आता सिंहाचा एक अनोखा आणि सर्वांनाच थक्क करुन सोडणारा एक अजब व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे ज्यात एक सिंह आणि सिंहीण गेंड्यांच्या कळपाला पाहून घाबरून पळत असल्याचे दृश्य दिसून आले. जंगलाचा राजा म्हणून ओळखला जाणारा सिंह असा घाबरुन पळत असल्याचे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यावेळा राजाची राणाही त्याच्या सोबत होती. सिंहीणीला घेऊनच सिंहाने जंगलात पळ काढला आणि हे दृश्य पाहून सर्वच अवाक् झाले. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो, यात जंगलात सिंह आणि सिंहीण विहार करत असतानात त्यांना वाटेत समोरुन गेंड्यांचा एक कळप त्यांच्या दिशेने येताना दिसून येतो. गेंड्यांच्या कळपाला पाहताच सिंह आणि सिंहीण एकदम घाबरतात आणि वाटेतच थांबून त्यांच्यापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करतात. सिंहीण सिंहाच्या मागे जाऊन लपते तर सिंह गर्जना करत त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करतो. पण असं करुनही जेव्हा गेंड्याचा कळप दूर जात नाही तेव्हा सिंह आणि सिंहीण दोघे संधीचा फायदा घेऊन वेळीच तिथून पळ काढतात. तिन गेंड्यांच्या या कळपासमोर एकटा गेंडा असहाय्य ठरतो आणि आपल्या पत्नीला घेऊन तिकडून पळण्याचा मार्ग त्याला योग्य वाटतो.
He wanted to impress his woman? pic.twitter.com/VnkRwjfGDi
— Vuvu Videos 🇿🇦 (@VideosVuvu) September 16, 2025
सिंह-सिंहीणीची ही हतबलता आणि घाबरटपणा पाहून अनेकजण अचंबित झाले आहेत. सिंहासारखा जंगलाचा राजा असा पळून जाताना पाहणे अनेकांसाठी नवे आणि आश्चर्याने भरलेले होते. जंगलाचा हा व्हायरल व्हिडिओ @VideosVuvu नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “त्याची बायको खूप समजूतदार आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हा कुठचा राजा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्याने प्रयत्न केला होता”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.