(फोटो सौजन्य: Instagram)
मानवाच्या खाण्या-पिण्यात अनेक वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश होतो, ज्यात चपाती, भात, भाज्या, चटणी अशा निरनिराळ्या पदार्थांचा समावेश होतो. पण जगण्यासाठी कोणी इंजिन ऑइल पिण्याता प्रकार तुम्ही ऐकला आहे का? नसेल तर आता हा दुर्लभ प्रकार तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यात राहणारा एक व्यक्ती रोज आपल्या आहारात कोणत्या अन्नाचे नाही तर चक्क इंजिन ऑइलचे सेवन करतो. जे इंजिन ऑइल गाड्यांमध्ये वापरले जाते, जे आपल्या शरीरासाठी घातक ठरते अशा ऑइलचे सेवन करुन हा माणूस अजूनही जिवंत कसा असा प्रश्न आता यूजर्सना पडला आहे. चला नक्की काय प्रकरण आहे ते सविस्तर जाणून घेऊया .
काय आहे प्रकरण?
फक्त इंजिन ऑइल पिऊन माणूस अन्नाशिवाय इतके वर्षे जगत आहे ही घटना अनेकांना विचित्र आणि खोटी वाटली पण ही बातमी खरी असल्याचे वृत्त आता समाोर येत आहे. कर्नाटकाचा रहिवासी असणारा हा व्यक्ती दररोज ७ ते ८ लिटर इंजिन ऑइल पिऊन आपला खुराक पूर्ण करतो. गेल्या ३३ वर्षांपासून तो इंजिन ऑइलचे सेवन करत आहे आणि तरीही त्याच्या शरीरावर याचा कोणताही परीणाम झालेला नाही. आपल्या या अनोख्या खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे त्याला ‘ऑइल कुमार’ असेही म्हटले जाते. असे म्हटले जात आहे की, हा माणूस इंजिन ऑइल सोडल्यास ब्रेड, बटर, भात, भाजी, फळे अशा कोणत्याही गोष्टीचे सेवन करत नाही. माणसाने असा दावा केला आहे की, इंजिन ऑइल पिऊन त्याच्यावर आजवर कोणत्याही रुग्णालयात जाण्याची वेळ आली नाही वा त्याला कोणताही आजार झाला नाही. इंजिन ऑइल पिणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला असून लोक यातील दृश्ये पाहून अचंबित झाले आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @avalakki_pavalakki नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “कोणत्या ब्रॅंडचा इंजिन ऑइल आहे हा ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अय्यप्पाची कृपा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “विज्ञानाला भावपूर्ण श्रद्धांजली”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.