(फोटो सौजन्य: Instagram)
आयपीएल २०२५ चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात झाला. आरसीबी संघाने हा सामना ६ धावांनी जिंकला. आरसीबीचा हा विजय सर्व फॅन्स तसेच खेळाडूंसाठी एक ऐतिहासिक क्षण ठरला, विजयानंतर चाहत्यांनाही देशभरात याचा आनंद साजरा केला. १८ वर्षांनंतर ट्रॉफी जिंकणे हा त्यांच्या संघासाठी खूप भावनिक क्षण होता. या १८ वर्षात आरसीबीला सोडले नाही तो खेळाडू म्हणजे विराट कोहली.
प्रत्येक मॅचदरम्यान विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे बरेच फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल होत असतात. आयपीएल फायनल जिंकल्यानंतरही हेच दृश्य पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. १८ वर्षांनी मिळालेल्या या विजयी पदाच्या आनंद साजरा करताना विराट भावूक झाला आणि त्याने प्रथम अनुष्काची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि विराटला आनंदाश्रू अनावर झाले. हा खास क्षण पाहून आता फॅन्सदेखील भावूक झाले असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
काय दिसलं व्हायरल व्हिडिओत?
आयपीएल फायनल जिंकल्यानंतर आपल्याला संपूर्ण स्टेडियममध्ये आनंदाचे वातावरण दिसू येते. यातच सर्वात लक्षवेधी ठरते ती विराट-अनुष्काची भेट! व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्याला अनुष्का पळत विराटला भेट द्यायला जाताना दिसून येते, यावेळी विराट तिच्यासमोर उभा असतो आणि दोघेही एकमेकांना एक घट्ट मिठी मारतात. दोघेही आनंदी असतात आणि यावेळीच विराट भावुक होतो आणि त्याला अश्रू अनावर झाल्याचे दिसून येते. यानंतर अनुष्का त्याला अभिनंदन करते आणि व्हिडिओ इथेच संपतो. आम्ही तुम्हाला सांगतो, देशभरात विराट-अनुष्काची जोडी फार लोकप्रिय आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यांनतर दोघांनीही लग्नगाठ बांधली. विराट कोहलीने या क्षणासाठी खूप मेहनत घेतली आहे. विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी, १९ वर्षांखालील विश्वचषक असे जेतेपद जिंकल्यानंतरही त्याच्या आयुष्यात जर काही कमी असेल तर ते आयपीएलचे जेतेपद होते, आज कोहलीने तेही साध्य केले आहे.
Everyone is looking at him and he’s just looking at her embracing his world in his arms🥹🧿❤️#ViratKohli #anushkasharma #virushka pic.twitter.com/aeuRptxE35
— s (@yaayerhs) June 3, 2025
दरम्यान विराट-अनुष्काचा हा सुंदर व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर केला जात आहे. याला @yaayerhs नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला, ‘सगळे त्याच्याकडे पाहत आहेत आणि तो फक्त तिच्याकडे पाहत आहे, तिच्या मिठीत त्याचे जग घेत आहे’ असे कॅप्शन देण्यात आले आहे.अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ते सुंदर आहे, ही मिठी अनंतकाळसारखी वाटते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आम्हाला असे आणखीन व्हिडिओ पाहायचे आहेत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही