(फोटो सौजन्य – Instagram)
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे नेहमीच काही ना काही व्हायरल होत असतं. इथे कधी स्टंट्स शेअर केले जातात, तर कधी अपघात तर कधी हास्यास्पद व्हिडिओ… लोक अनेक अजब गजब गोष्टी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर करत असतात. एक असाच व्हिडिओ सध्या इथे वेगाने शेअर झाला आहे ज्यातील दृश्ये आता अनेकांना थक्क करत आहेत. हा व्हिडिओ बिहारमधील असून यात एक व्यक्ती चक्क पाण्यात ट्रॅक्टर चावलताना दिसून येत आहे. आता असे करताना पुढे नक्की काय घडून आले चला जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
तुम्ही रस्त्यावर बाईक, कार आणि इतर वाहने चालवणाऱ्या लोकांना अनेकदा पाहिले असेल, पण पाण्यात ट्रॅक्टर चालवणाऱ्यांना तुम्ही क्वचितच पाहिले असेल. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस ट्रॅक्टर चालवत नदीत पुढे जात असल्याचे दिसून आले आहे, जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी ट्रॅक्टरच्या मागे ट्रॉलीवर काहीतरी भरलेले आहे आणि त्यावर एक माणूस उभा आहे. तथापि, व्हिडिओचा शेवट पूर्ण दाखवण्यत आला नसून यात ट्रॅक्टर पाण्यात काही अंतरापर्यंतच जाताना दिसून आला. दरम्यान बिहारमध्ये असे अनेक प्रकार घडून येत असतात जे इतर जगापासून वेगळे असतात आणि ते नेहमीच आपल्याला थक्क करतात.
हा व्हायरल व्हिडिओ @jeejaji नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला, ‘बिहारमधील टायटॅनिक’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्समध्ये यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे बिहार आहे लाला, इथे काहीही होऊ शकते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “शेवटपर्यंत दाखवा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही