(फोटो सौजन्य:Instagram)
सोशल मीडियावर सध्या एक अद्भुत व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे ज्यात एका व्यक्तने मेटल डिटेक्टरच्या मदतीने खजिना शोधल्याचे दिसून आले. फार पूर्वी लोक आपला खजिना अशा जागी दडवून ठेवायचे ज्याचा लोकांना थानपत्त्ता लगूरू नये अशात हे दडवलले खजिने जेव्हा अचानक समोर येतात तेव्हा ते पाहून लोक थक्क होतात. आताही या खजिन्याचा व्हिडिओ वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत असून यातील दृश्ये पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का मिळत आहे. व्हिडिओत नक्की काय काय घडले ते जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती खजिन्याच्या शोधात पायी जात असल्याचे दिसून येत आहे. इंटरनेटवर शेअर केलेल्या फुटेजमध्ये एक व्यक्ती डोंगराळ भागात मेटल डिटेक्टर वापरताना दिसत आहे. डिटेक्टर अचानक बीप वाजू लागतो, ज्यामुळे ती व्यक्ती जवळचे खडक फोडू लागतो. खूप प्रयत्न केल्यावर, दगडाखाली दबलेली एक छोटी, प्राचीन पेटी दिसते. ही पेटी उघडताच व्यक्तीला त्यात काही सोन्याची नाणी सापडतात.
मात्र व्हिडिओत दाखवण्यात आलेले हे ठिकाण कोणते याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. हा व्हिडिओ @_.archaeologist नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेरा करण्यात आला आहे. या अकाऊंटवर अशाच खजिन्याची शोधाशोध करणारे अनेक व्हिडिओ आहेत, यातील अनेक व्हिडिओजना लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी केली जाऊ शकत नाही, परंतु याने सोशल मीडियावर आता धुमाकूळ घालता आहे. हा व्हिडिओ 120 दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे.
अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स देखील केल्या आहेत. कमेंट्समध्ये, लोक फक्त खजिन्याबद्दल प्रश्न विचारत आहेत. काही युजर्स याबाबत संशय व्यक्त करत आहेत तर काहीजण याबाबत आपले आश्चर्य व्यक्त करत आहेत . अनेक युजर्सने व्यक्तीच्या यशाचे कौतुक केले आहे. अनेकांनी मेटल डिटेक्टर खरेदी करण्याबाबत अनेकांनी चौकशी केली आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.