(फोटो सौजन्य: X)
सिंह हा जंगलातला सर्वात धोकादायक प्राणी मानला जातो तर सापही सर्वात विषारी आणि घातक प्राण्यांपैकी एक आहे. या दोघांना पाहून जंगलातील मोठमोठे प्राणीही दचकतात अशात माणसाची त्यांच्यासमोर कायच मजाल… अशातच आता एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात एक व्यक्ती एकाच वेळी सिंह आणि साप या दोन्ही शिकाऱ्यांच्या विळख्यात अडकल्याचे दृश्य दिसून आले. हे दृश्य इतके भयाण आहे की ते पाहून कुणालाही धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. चला व्हिडिओत काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
ऑनलाईन सुरु होती हाय कोर्टची सुनावणी, व्यक्तीने टॉयलेटमध्ये हलकं होत ऑन केला कॅमेरा; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक व्यक्ती सिंहाच्या भीतीने झाडावर बसलेला दिसून येतो. तो खाली पाहतो तर खालून सिंह त्याच्यावर निशाणा साधून बसलेला असतो. पण खरा ट्विस्ट तर तेव्हा येतो जेव्हा व्यक्ती मान फिरवून दुसऱ्या दिशेला बघतो. त्याला समजते की, तो ज्या झाडावर चढलेला असतो तिथे आधीपासून एक साप आपल्या शिकाऱ्याची वाट बघत बसलेला असतो. सापाला असे समोर पाहताच व्यक्तीच्या अंगाला घाम फुटतो. खाली सिंह आणि झाडावर साप यांच्या मध्ये अडकलेला व्यक्ती हे सर्वच दृश्य युजर्सना थक्क करून जाते. व्हिडिओत पुढे काय घडलं ते मात्र स्पष्ट करण्यात आलं नाही. आता हा व्हिडिओ खरा आणि खोटा याची पुष्टी झाली नाही कारण काहींना हे दृश्य बनावटी वाटत आहे. दरम्यान असे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि लोकांना निसर्गाची जाणीव करून देतात, परंतु त्याच वेळी त्यांची सत्यता काळजीपूर्वक तपासणे देखील महत्त्वाचे आहे.
Who are we hiding from? pic.twitter.com/WuJbH8d5VO
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) June 26, 2025
केरळच्या पुरात गजराजाचे हाल झाले बेहाल; तब्बल ३ तास लाटांना झुंज दिली पण शेवटी जे घडलं…. Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत १ मिलियनहुन अधिकच्या व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “खोटं आहे हे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “झाडावरचा हा गृहस्थ नायजेरियन आहे. एक लोकप्रिय कंटेंट क्रिएटर. हा व्हिडिओ खरा आहे का?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.