भारी डोकं लावलं भावाने! पेटलेला ट्रक थेट फायर स्टेशनमध्ये घुसवला; ड्रायव्हरची हुशारी बघून नेटकरी हैराण, व्हिडिओ व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ खूप मजेशीर असतात, तर काही व्हिडिओ हैराण करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका ट्रकला भीषण आग लागली आहे, पण ट्रक चालकाने असे काही केले आहे की सर्वजण हैराण झाले आहेत. शिवाय अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी देखील असे काही घडले याची अपेक्षा केली नसणार असे घडले आहे.
सहसा कोणत्याही ठिकाणी आग लागल्यावर आपण अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी फोन करतो. मात्र या ट्रक चालकाने थेट अग्निशमन कार्यालयात एन्ट्री घेतली आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा परदेशातील असल्याचे लक्षात येते. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक ट्रक रस्त्यावरुन पळत आहे. ट्रकला भीषण आग लागली आहे. यामुळे ट्रक चालक वेगाने गाडी चालवत आहे. ट्रक चालक ट्रक घेऊन थेट फायर स्टेशन डिपार्टमेंटमध्ये जातो. जिथे पोहोचल्यावर अग्निशमन कर्मचारी देखील हैराण होतात. पण सर्व कर्मचारी आग विझवण्यासाठी पाण्याचा पाईप घेऊन येतात. आणि तातडीने आगीवर ताबा मिळवतात. तोपर्यंत ट्रक चालक कार्यालयाच्या बाहेर ट्रक थांबवून खाली उतरतो. काही वेळातच अग्निशमन कर्मचारी आग विझवतात. सध्या या व्हिडिओमुळे ट्रक चालकाचे कौतुक केले जात आहे. ट्रक चालकाच्या सावधगिरीचे आणि हुशारीचे लोकांनी कौतुक केले आहे.
व्हायरल व्हिडिओ
A truck caught fire and the driver, instead of calling the fire department, chose to take the truck to them.
Now that’s the crisis management style of men. 😂 pic.twitter.com/LX69PnDlmI
— The Figen (@TheFigen_) August 31, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @TheFigen_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. अनेकांनी ट्रकला आग कशी लागली असा प्रश्न केला आहे. लोकांनी ट्रक चालकाच्या सावधगिरीचे आणि हुशारीचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, सगळ्यात योग्य उपाय आहे हा असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने भाऊने भारी डोकं लावलं असे म्हटले आहे. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.