आजकाल सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी आपल्याला हसवतात कधी रडवतात तर कधी थक्क करून जातात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एका लहान मुलगी चक्क एका विषारी सापाला घेऊन खेळताना दिसून येत आहे. मुख्य म्हणजे यावेळी या सापाने मुलीच्या गळ्याभोवती विळखा घातलेला असतो. व्हिडिओ पाहून आता मुलीचा जीव जातोय का काय असे वाटू लागते. अनेकजण हा व्हिडिओ पाहून आता मुलीच्या पालकांवर भडकले आहेत तसेच व्हिडिओवर टीकादेखील करण्यात आली आहे.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओत जर आपण पाहिले तर दिसते की, एका चिमुकली लहान मुलगी आपल्या घराच्या बाहेरील गार्डनमध्ये उभी आहे. यावेळी तिच्या हातात एक काळया रंगाचा भलामोठा साप असतो. हा विषारी साप हळूहळू तिच्या गळ्याभोवती विळखा घालण्याचा प्रयत्न करत असतो. या सापाला अजिबात न घाबरता चिमुकली त्यासोबत खेळण्याचा प्रयत्न करत असते. बहुदा त्या मुलीला माहिती नसावे की हा साप कसा तिच्या जीवावर बेतू शकतो. हा सर्व प्रकार पाहून आता युजर्स हैराण झाले आहेत. सुदौवाने यात मुलीला कोणतीही दुखापत होत नाही.
हेदेखील वाचा – “अन्… नाव घेतो हिल पोरी हिला” पंढरपूरच्या आजोबांचा हटके उखाणा होतोय Viral
आरियाना असे या मुलीचे नाव आहे, तिला सापांची फार आवड आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे 400,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिचा बायोमध्ये “फक्त एक मुलगी आणि तिची सापांबद्दलची आवड” असे लिहिले आहे. याआधीही ती अनेक प्रकारचे साप आणि इतर प्राण्यांसोबत मजा करताना दिसून आली. मात्र हा सर्व प्रकार बघून नेटकरी तिच्या पालकांवर फार भडकले आहेत. त्यांना आपल्या मुलीची अजिबात काळजी नाही तसेच ते आपल्या मुलीला मरणाच्या दारात कसे फेकू शकतात असा शब्दात आता त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
हेदेखील वाचा – किंग कोब्राने ओकले एकामागून एक 3 साप, रस्त्यावरील भयाण दृश्य पाहून सर्वच झाले थक्क, Video Viral
हा व्हिडिओ @snakemasterexotics नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘अरे मी स्नेकमास्टरेक्सोटिक्सची एरियाना आहे. अंदाज करा काय. माझ्या गळ्यात हा मोठा साप गुंडाळला आहे. पण काळजी करू नका. मी ते नियंत्रणात आणले आहे. एखाद्या व्यावसायिकाप्रमाणे साप हाताळणे माझ्यासाठी सोपे काम आहे.” असे लिहिण्यात आले आहे.
व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “तुम्ही कसले पालक आहात. गरीब मुलाला धोका कळत नाही.” तर दुसऱ्याने लिहिले, “कोणीतरी या माणसाला अटक करणे आणि त्या मुलासाठी दुसरे कुटुंब शोधणे आवश्यक आहे,” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ती फक्त एक लहान मुलगी आहे,” अजून एकाने लिहिले आहे, “त्या सापाने त्या मुलाला गुदमरून मारले असते”.