(फोटो सौजन्य: X)
व्यसनात बुडालेला व्यक्ती आपल्या आयुष्याचं मातेरं करतो हेच खरं. आपले आयुष्य हे इतके स्वस्त नाही मात्र तरीही अनेकजण व्यसनाच्या आहारी जाऊन आपला जीव धोक्यात घालतात आणि वाईटरित्या जीवाला मूकतात. मद्यधुंद अवस्थेत अनेकांनी आपला जीव गमावला आहे आणि याचाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये व्यक्ती मद्यपान करून रेल्वेच्या छतावर उभा असल्याचे दिसते आणि याच वेळी काळाचा घात क्षणातच त्याचा जीव घेतो. नक्की काय घडले ते आपण सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
दारू पिल्यानंतर लोक एका वेगळ्याच दुनियेत पोहचतात, आपण काय करत आहोत, कुठे आहोत याची सूद त्यांना राहत नाही. असाच एक व्यक्ती दारू पिऊन ट्रेनच्या इंजिनवर चढतो आणि मद्यधुंद अवस्थेत तो विजेच्या तरुणांना स्पर्श करतो. यांनतर काय जसा त्याचा स्पर्श तारांना होतो तिथे एक मोठा स्फोट होतो. आगीच्या ज्वलंत प्रकाश दिसू लागतो आणि यातच जळून व्यक्ती थेट रेल्वेवरून खाली पडतो. संपूर्ण प्लॅटफॉर्म मेघगर्जनेने आणि विजेच्या ठिणग्यांनी थरथर कापत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते. हे धोकादायक दृश्य पाहून रेल्वे प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेले लोक पाहतात, तर काहीजण आपल्या फोनच्या कॅमेरामध्ये हे दृश्य कैद करू लागतात. मृत्यूचा हा थरार आता अनेकांच्या अंगावर काटा आणत आहे तर हा व्हिडिओ आपल्याला पुन्हा याची जाणीव करून देतो की व्यसन आपल्या जीवासाठी किती धोकादायक ठरू शकतो.
नशा करने को इसलिए मना करते है
नशे में धुत होकर इसने रेलवे लाइन की बिजली का तार ही पकड़ लिया, अंजाम आप देख सकते है 👇 pic.twitter.com/FZPzW7Sw3X
— Rahbar Raza Zaidi (@rrzaidi1234) June 27, 2025
घटनेचा व्हायरल व्हिडिओ @rrzaidi1234 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘म्हणूनच नशा करायला मनाई केली जाते. मद्यधुंद अवस्थेत त्याने रेल्वे लाईनवरील विजेच्या तारेला पकडले, तुम्ही निकाल पाहू शकता’. व्हिडिओला चांगले व्युज आले असून लोक वेगाने हा व्हिडिओ शेअर करत आहेत. तथापि ही घटना पहिलीच नाही याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे वारंवार असे होऊनही लोक आपला मूर्खपणा थांबवत नाहीत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.