(फोटो सौजन्य: Instagram)
जगात आईहून मोठा योद्धा कुणी नाही. नऊ महिने ज्याला आपल्या पोटात वाढवलं त्याच्याशी आईशी नाळ अशे जोडली जाते की जीवनातील कोणतीही गोष्ट तिला आपल्या बाळापासून वेगळं करू शकत नाही. मुलांवर प्रेमाचा वर्षाव करणारी ही आई वेळ आली तर धैर्याने संपूर्ण जगाशीही लढू शकते. आईचे आपल्या मुलांवर निस्वार्थी प्रेम असते. हे प्रेम तुम्हाला इतर कुठेही नाही तर फक्त आईच्या कुशीतच मिळू शकते. वेळ आली तर स्वतःचा जीव धोक्यात घालून ती आपल्या मुलांचे संरक्षण करते आणि असेच एक दृश्य आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. चला काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
आईचे प्रेम हे फक्त माणसांपुरतेच मर्यादित नसून पक्षी, प्राण्यांमध्येही आई ही शेवटी आईच असते. ती आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावते पण मुलाला काही होऊ देत नाही आणि आताच्या व्हिडिओतही असेच एक दृश्य दिसून आले. व्हिडिओमध्ये एक शेतकरी ट्रॅक्टरने आपले शेत नांगरत असल्याचे दिसून येते. याचवेळी एक पक्षी शेताच्या किनाऱ्यावर उभा असून आपले पंख उंच करतो. जणू ती शेतकऱ्याला गाडी पुढे नेण्यापासून रोखत आहे. व्हिडिओत निरखून पाहिल्यास समजते की, पक्ष्याची दोन अंडी त्याजागी ठेवलेली असतात आणि त्यांच्या रक्षणासाठी ती मादी पक्षी ढाल बनून ट्रॅक्टरसमोर उभी असते. हे दृश्य खरोखरच हृदयस्पर्शी आहे. शेवटी शेतकऱ्याचा उदारपणाही व्हिडिओत दिसून येतो, शेतकरी ती जागा सोडून संपूर्ण शेत नागरतो आणि आपल्या उदारतेचे दर्शन घडवतो. पक्षी मात्र शेवटपर्यंत आपल्या अंड्यांचे रक्षण करण्यासाठी तिथे उभा राहतो आणि इथेच व्हिडिओचा शेवट होतो.
हा हृदयस्पर्शी व्हिडिओ @bapu__nikulsinh__rathod नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “काळजी करू नका, अन्न पुरवणारा शेतकरी ट्रॅक्टरवर बसला आहे, सरकार नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ड्रायव्हरला सलाम” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आईच ती शेवटी”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.