मुंबईच्या रस्त्यावर Lamborghini चा धुमाकूळ (Photo Credit- X)
Mumbai Viral Video: शहरातील वेगाची वाढती क्रेझ पुन्हा एकदा समोर आली आहे. मुंबईच्या कोस्टल रोडवर एका लक्झरी कार चालकाने रस्त्याला रेसिंग ट्रॅक समजून बेदरकारपणे गाडी चालवली. या बेफिकीर ड्रायव्हिंगमुळे कारचा अपघात झाला असून, या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी तातडीने कारवाई करत चालकाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
ही घटना रविवार, ९:२० वाजता दक्षिणेकडे जाणाऱ्या कोस्टल रोडवर, नमन बिल्डिंगजवळ घडली. एका व्यक्तीने आपल्या भगव्या रंगाच्या लॅम्बोर्गिनी कारला धोकादायक पद्धतीने चालवले. कार वेगाने चालवताना वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
Yesterday a Lamborghini crashed on the Mumbai Coastal road around 9.20 am, driver escaped unhurt. pic.twitter.com/SMZrVqmTkz
— Richa Pinto (@richapintoi) September 22, 2025
हिरोगिरी नडली! फोटोसाठी कॉन्स्टेबलने कोब्राला तोंडात धरला अन्…; पुढं जे घडलं भयानक, Video Viral
तपासात पोलिसांना MH 01 EW 8010 या क्रमांकाची लॅम्बोर्गिनी कार आढळली. चालकाच्या निष्काळजीपणामुळे स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या गंभीर कृत्याबद्दल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. चालकाचा ड्रायव्हिंग लायसन्स आणि कार मालकाची माहिती गोळा केली जात आहे.
कोस्टल रोडवरील ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा मुंबई पोलीस रस्ते सुरक्षेबाबत सतत सतर्क असतात. यामुळे बेदरकार ड्रायव्हिंगचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.