हिरोगिरी नडली! फोटोसाठी कॉन्स्टेबलने कोब्राला तोडांत धरला अन्...; भयानक Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र तर कधी भयावह व्हिडिओ पाहायला मिळतात. अलीकडे सोशल मीडियावर तुम्ही सापांना रेस्क्यू करणाऱ्यांचे व्हिडिओ देखील पाहिले असतील. सापाला रेस्क्स्यू करताना खूप काळजी घ्यावी लागते. चुकूनही सापाचा दंश झाल्यास व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता असते. पण काही लोक स्टंटबाजीच्या नादात, हिरो बनण्याच्या नादात स्वत:चा जीव धोक्यात घालून बसतात. असेच काहीसे मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये घडले आहे.
एका कॉन्स्टेबलचा त्याची हिरोगिरी खूप महागात पडली आहे. कोब्राला रेस्क्यू करताना त्याच्या दंशामुळे कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. स्टाईल मारयाला गेला अन् जीव गमावून बसला असे काहीसे घडले आहे. रविवारी (२० सप्टेंबर) रोजी ही घटना घडली असल्याचे वृत्त मिळाले आहे. एक कॉन्स्टेबल कोब्राला रेस्क्यू करण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने त्या सापाला स्टाईलमध्ये पकडले आणि नंतर त्याला दातात धरुन स्टंट करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी सापाने त्याला दंश केला. त्याला तातडीन रुग्णलयात नेण्यात आले होते, पण त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सापाने दंश करताचा त्याच्या संपूर्ण बॉडीत विष पसरले होते. कॉन्स्टेबलचे नाव संतोष चौधरी असून वय ७३ वर्षे आहे. त्यांच्या पाश्चात्य पत्नी, मुलगा आणि मुलगी असे कुटुंबीय आहेत. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
अश्लीलतेचा कळस! बस स्टँडवर प्रेमी युगलाचा खुल्लम खुल्ला रोमान्स; आधी मिठी मारली मग… Video Viral
व्हायरल व्हिडिओ
इंदौर में 17 साल से सेवा कर रहे कांस्टेबल संतोष चौधरी की मौत जहरीले साँप के काटने से हो गई।
साँप पकड़ने और उसके साथ तस्वीर खिंचवाने के दौरान हादसा हुआ। इलाज के बावजूद वे बच नहीं सके.. pic.twitter.com/hd3KyRSlCE
— 𝙼𝚛 𝚃𝚢𝚊𝚐𝚒 (@mktyaggi) September 22, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर @mktyaggi यावर शेअर करण्यात आला असून या घटनेची माहिती कॅप्शनमध्ये देण्यात आली आहे. अनेकांनी कशाला नको ती हिरोबाजी असे म्हटले आहे. पोलिसांनीच असे धोकादायक स्टंट केले तर लोक काय शिकणार असे म्हटले आहे. या घटनेने इंदोरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
निसर्गाच्या हाकेला आजोबांनी मेट्रोमध्येच दिला होकार..; सर्वांसमोरच केली लघुशंका, Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.