नेपाळमध्ये हेलिकॉप्टरला लटकताना दिसले मंत्री; तर शॉपिंग मॉल लुटताना लोक अन् हिंसक जमाव, भयावह Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Nepal Violence news in Marathi : काठमांडू : नेपाळमध्ये गेल्या काही दिंवसापासून भयावह वातावरण निर्माण झाले आहे. सरकारच्या सोशल मीडियावरील बंदीमुळे जनरेशन-झेडने तीव्र आंदोलन सुरु केले होते. यावेळ मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडला. अनेक तरुणांना मारहाण करण्यात आली, तसेच त्यांच्यावर पाण्याच्या तोफांचा आणि अश्रुधुरांचा वापार करण्यात आला. पोलिस आणि आंदोलन कर्त्यांमध्ये मोठी चकामक झाला.
तरुणांनी संसद भवनल, राष्ट्रपती भवन, सरकार कार्यलये, राजकीय कार्यालयांना पेटवून दिले. तसेच तरुणांना देखील अनेक मंत्र्यांना मारहाण केली, मंत्र्यांची घरे जाळली. यावेळी बिघडती परिस्थिती पाहता अनेक मंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी राजीनामा दिला. सध्या देशात अनेक भागांत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. नव्या सरकराच्या स्थापनेसाठी हालचाली सुरु आहेत. यादरम्यान सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत.
यावेळी अनेक मंत्री आपाल जीव वाचवण्यासाठी पळत होते. सुरक्षा दलांच्या मदतीने त्यांना वाचण्याचे प्रयत्न सुरु होते. यासाठी हेलिकॉप्टर्स देखील मागवण्याताले. यावेली हेलिकॉप्टर्समधून सोडलेल्या दोरील लटकून जाताना मंत्र्यांचे एक कुटुंब दिसले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ @jimNjue_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. तसेच अनेक मंत्र्यांना मारहाणीचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेपाळचे अर्थमंत्री विष्णू पोडोल यांनाही त्यांच्य घराबाहेर बेदम मारहाण करण्यात आली होती.
Politicians escaping the wrath of the people in Nepal pic.twitter.com/tia5JjkqmL
— jim Njue (@jimNjue_) September 10, 2025
खालील दिलेल्या व्हिडिओमध्ये लोक हिंसक निदर्शनांचा फायदा घेत, दुकाने आणि मॉल लुटनाताना दिसत आहेत. तसेच दुकानांची तोडफोड करताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओ @Platypuss_10 या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.
One more video of looting.
During the Nepal protest, Many people were seen looting shops & shopping malls! pic.twitter.com/7BdlU8JmiO— Chauhan (@Platypuss_10) September 10, 2025
तसेच पुरुषांना दारुची दुकानेही लुटली आहेत. खालील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लोक बादल्यांमध्ये मद्य पेय घेऊन जताना दिसत आहे. दारुच्या बाटल्या घेऊन जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Platypuss_10 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यापूर्वी संसद पेटवल्यानंतर एक व्यक्ती रिल बनवतानाही दिसला होता.
Even Many protesters in Nepal seen looting Alcohol & Liquors during the Protest! https://t.co/bYk58RfB6g pic.twitter.com/idpfjnOpFI
— Chauhan (@Platypuss_10) September 10, 2025
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.