(फोटो सौजन्य: X)
दिवाळीचा सण म्हणजे उत्साह, प्रकाश, आणि फटाक्यांची आतषबाजी आणि याचाच प्रभाव सध्या सोशल मीडियावर दिसतो आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरसारख्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर सध्या सर्वाधिक व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये फटाके फोडण्याचे व्हिडिओ अग्रस्थानी आहेत. दिवसभर सोशल मीडिया स्क्रोल केल्यावर तुम्हालाही लक्षात आलं असेल की, बहुतांश पोस्ट्स दिवाळीशी संबंधित आहेत.असाच एक व्हिडिओ सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकजण हादरले आहेत. व्हिडिओमध्ये 3 कोटींचे फटाके फुटल्याचा दावा करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सतत मोठमोठ्या आवाजात फटाके फुटताना ऐकू येतात. असं वाटतं की एखाद्या मोठ्या प्रमाणावर फटाक्यांना एकत्र करून त्यांना आग लावण्यात आली आहे. संपूर्ण परिसरात धुराचं मोठं लोट दिसून येतो आणि दृष्यं धक्कादायक वाटतात. हा व्हिडिओ शेअर करताना सांगितलं जातं की, तो उत्तर प्रदेशातील फतेहपूर इथला आहे. पोस्टच्या कॅप्शननुसार, तिथल्या फटाका मार्केटला आग लागून जवळपास 70 दुकानं पूर्णतः जळून खाक झाली, अंदाजे 3 कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे, 2 किलोमीटरपर्यंत फटाक्यांचा आवाज ऐकू गेला, 50 हून अधिक वाहने जळून खाक झाली आणि अनेकजण जखमी झाले आहेत. दरम्यान घटनेची अधिकृत माहिती मात्र अद्याप समोर आली नाही.
यूपी के फतेहपुर में पटाखा मार्केट जलकर खाक, 70 दुकानों में 3 करोड़ रुपए के पटाखे स्वाहा, दो किलोमीटर तक आवाज, धुएं के गुबार, 50 से ज्यादा वाहन नष्ट, कई घायल। pic.twitter.com/Uv8tJSNLiH — The Advocate (@theadvocate26) October 20, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @theadvocate26 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “सेफ्टी स्टँडर्ट्स असायला हवेत ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजूबाजूच्या लोकांना यातून येणाऱ्या धुराचा फार त्रास होईल” आणखीन एका युजरने लिहिलं आहे, “ही फार दुःखद घटना आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






