साहसाला सलाम! बर्फाळ टेकड्यांवर साडी नेसून महिलांचे स्नोबोर्डिंग; पाहून नेटकरीही थबकले; Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की दोन महिलांनी लाला साडी घातली आहे. या महिला बर्फाळ टेकडीवर स्नोबोर्ड घेऊन सर्फिंग करत आहे. एक भारतीय स्नोबोर्डर उर्मिला आहे तर दुसरी स्विस लिंडा आहे. दोघीही साडी घालून स्नोबोर्डिग करत आहेत. त्यांचा आत्मविश्वासही जबरदस्त आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण थक्क झाले आहे. हा व्हिडिओ लोकांना मोहित करत आहे. संस्कृती आणि खेळाचे अनोखे संगम असणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ खेळाडूंनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओ च्या कॅप्शनध्ये Saree Not Sorry असे लिहिले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. एका नेटकऱ्याने हा पुरावा आहे की, महिला कोणत्याही क्षेत्रात उत्तम कामगिरी करु शकतात असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकान मी पाहिलेला आतापर्यंत सर्वात संदुर साडी फ्लेक्स असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने हे खूपच भारी आहे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या प्रचंड पसंतीस पडत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






