(फोटो सौजन्य: instagram)
वन्य प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही शेअर होत असत. या व्हिडिओमधून त्यांच्या जीवनातील काही रंजक गोष्टी आपल्या समोर येतात. यात दिसणारी दृश्ये अनेकदा आपल्याला चकित करतात. अलीकडेच इथे एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये सिंह आणि साप यांच्याशी संबंधित एक मनोरंजक दृश्य दाखवण्यात आले आहे. जंगलातील हे दोन धोकादायक प्राणी आमने-सामने आल्यानंतर काय होईल याचा विचार करा. हे दृश्य फार रोमांचक वळण घेते जेव्हा साप कुतूहलाने सिंहाच्या तोंडात आपले मुख टाकतो. पुढे काय घडत ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये सिंह एका ढिगाऱ्याजवळ आरामात बसला आहे. त्याचे डोळे बंद आहेत आणि तोंड किंचित उघडे आहे, जणू तो गाढ झोपेत आहे. सिंहाची ही स्थिती कोणालाही सामान्य वाटू शकते, परंतु काही सेकंदातच या व्हिडिओमध्ये असे काही घडते, जे पाहून लोक हैराण होतात. सिंहाला आळस येताच तो जांभई घेतो ज्यात त्याचे तोंड उघडते यावेळी एक साप टक लावून सिंहाकडे पाहत असतो ज्याची कल्पना सिंहाला नसते. सिंहाने तोंड उघडताच हा साप लगेच त्याच्या तोंडात डोकावून पाहतो.
यावेळी सिंहाला याचे भान राहत नाही कारण तो आरामात बसलेला असतो आणि त्याचे डोळे बंद असतात. हे दृश्य खूपच विचित्र आणि गूढ वाटते, कारण सिंहासारख्या मोठ्या आणि धोकादायक प्राण्याची सापासोबत अशी भेट पाहणं सगळ्यांसाठीच कोणत्या सरप्राइजहुन कमी नाही. पुढे आपण पाहू शकतो की, सापाने आपले तोंड सिंहाच्या तोंडात टाकताच सिंह आपले डोळे उघडतो आणि समोरील दृश्य पाहून हादरतो. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या मनात आता अनेक प्रश्न निर्माण करत असून लोक यातील दृश्ये पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. अनेकांना प्रश्न पडतो की हा सीन खरा आहे की कुठल्यातरी एआय जनरेटेड व्हिडीओ आहे.
असं काय होतं बिलात? पोटभर जेवला अन् बिल पाहताच आला हार्ट अटॅकचा झटका; मृत्यूचा थरारक Video Viral
साप आणि सिंहातील हे मनोरंजक दृश्य @heavenly_nature_1 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे जे आता वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक यावर आपल्या निरनिराळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जर हा सिंह ईडन बागेत असता तर…” दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “साप म्हणत असेल सिंहाच्या मुखातून वाचून आलोय”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.