(फोटो सौजन्य: instagram)
सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असतं, ज्यामुळे लोक आश्चर्यचकित होतात. इथे कधी स्टंट्सचे व्हिडिओ शेअर होतात तर कधी भन्नाट जुगाडांचे तर कधी धक्कादायक अपघातांचे. तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल तर तुम्ही इथे असे अनेक व्हिडिओज पाहिले असतील. हे व्हिडिओ अनेकदा आपल्याला थक्क करून जातात. आताही इथे असाच एक व्हिडिओ शेअर झाला आहे जो लोकांना आश्चर्यचकित करत आहे. यातील दृश्ये तुमच्या कल्पनेच्या पलीकडील आहेत, ज्यांना पाहून तुमच्या पायाखालची जमीनच हादरेल.
काय आहे व्हिडिओत?
सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती विजेच्या खांबावर चढताना दिसत आहे. सुरुवातीला तो काय करणार आहे हे कोणालाच समजत नाही, परंतु काही काळानंतर परिस्थिती स्पष्ट होते. त्या व्यक्तीने विजेच्या खांबाच्या तारा पकडून पुश अप्स करायला सुरुवात केली. हे दृश्य इतके धक्कादायक होते की प्रेक्षक ते थक्क झाले.
असं काय होतं बिलात? पोटभर जेवला अन् बिल पाहताच आला हार्ट अटॅकचा झटका; मृत्यूचा थरारक Video Viral
सहसा लोक पुश अप्स करण्यासाठी विशेष सुविधा वापरतात. मात्र या व्यक्तीने यासाठी चक्क विजेचा खांबच निवडला. विजेच्या खांबाच्या तारांना धरून पुश अप करू लागला. हे खरोखरच आश्चर्यकारक होते, कारण विजेच्या तारांशी छेडछाड करणे फार धोकादायक ठरू शकते. विजेचा एक करंट आपल्याला मृत्यूच्या दारी पोहचवू शकतो अशात व्यक्तीचे हे कृत्य कोणत्या धोक्याहून कमी नाही. आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता की तो हा धोकादायक व्यायाम तो अगदी सहजपणे करत असतो, जो करण्याचा आपण कधी विचारही करू शकणार नाही.
हा धक्कादायक व्हिडिओ @fitnesshaven_official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला. व्हिडिओ शेअर होताच तो वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया युजर्स आश्चर्यचकित झाले असून काहीजण या व्यक्तीच्या फिटनेसचे कौतुकही करत आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तो मृत्यूसोबत ट्रेनिंग करत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “शिजवण्यापूर्वी स्नायूंना शिजवत आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.