अंत्यसंस्कार पूर्ण होईपर्यंत स्मशानात थांबायचा... श्वानाच्या निधनाने गाव हळहळलं, भावपूर्ण निरोपाचा Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
प्राण्यांमध्ये सगळ्यात ईमानदार हा कुत्रा मानला जातो. त्याचं माणसासोबतचं नातं नेहमीच थक्क करणारं असते. असेच राजस्थानच्या ब्यावर जिल्ह्यातील राजियावास गावातील एक श्वानाबाबत अत्यंत भावूक घटना समोर आली आहे. गावात राहणाऱ्या डॉग-सा नावाच्या एका भटक्या श्वानाच्या मृत्यूने संपूर्ण गाव हळहळले आहे. या श्वानाला गावकऱ्यांनी एका कुटुंबातील सदस्याप्रमाणे अखेरचा निरोप दिला आहे.
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉग-सॉ हा भटका कुत्रा नव्हता. गावात जेव्हा-कोणी कोणाचेही निधन व्हायचे तेव्हा तो न चुकता त्यांंच्या घरी जायचा. त्यांच्या अंतयात्रेत शांतपणे माणसांसोबत स्मशानभूमीपर्यंत चालायचा. दु:खाच्या कठीण प्रसंगी, त्याची शांती लोकांना भावनिक आधार द्यायची. यामुळे तो सगळ्या गावकऱ्यांचा लाडका बनला होता.
५ जानेवारीला या श्वानाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळला अ्न त्याच्या मृत्यूची बातमी संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरली. त्याच्या मृत्यूने पूर्ण गावावर शोककळा पसरली. यानंतर सर्व गावकऱ्यांनी मिळून गावचे सरपंच बृजपाल यांच्या नेतृत्त्वाखाली हिंदू परंपरेनुसार, भव्य अंत्ययात्रा काढली. त्याला एखाद्या माणसाप्रमाणेच सन्मा देण्यात आला. केवळ अंत्यसंस्कारचा नाही, तर त्याच्या आत्माच्या शांतीसाठी जेवणाचे आयोजनही करण्यात आले.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @beawarfever या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. तर The Better India ने हा संवेदनशील आणि माणुसकीचा प्रयत्न देणारी घटना लोकांपर्यंत पोहोचवली आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून या अनोख्या अंत्ययात्रेची आणि गावकऱ्यांचीय माणुकीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
स्पेसमधून कशी दिसते पृथ्वी? प्रकाश आणि चंद्राचा लपंडाल… अद्भूत दृष्य कॅमेरात कैद; Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






