फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर आपल्याला रोज वेगवेगळे व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेकदा आपल्याला असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो तर अनेकदा असे व्हिडिओ पाहतो ज्यामुळे आपले मनोरंजन होते. सध्या सोशल मीडियावर लहानांपासून मोठ्यांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत, सामान्य नागरिकांपासून सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच काही ना काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हिडिओ बनवत असतात. सध्या एका शिक्षकाचा विचित्र व्हिडिओ व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत शिक्षक शिकवताना अचानक असं काहीतरी विचित्र करायला लागतात की, हा व्हिडिओ पाहून लोकांनी शिक्षकाच्या अंगात भूत शिरले की, काय असे म्हटले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओचा अनेकांनी आनंद तर लुटलाच आहे पण अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. तर अनेकांनी असा अंदाज बांधला आहे की, बहुतेक सर विद्यार्थ्यांचे मनोरंजन करत असतील.
व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एका वर्गात, शिक्षक फळ्यावर काहीतरी लिहित असतात. पण अचानक ते विचित्र कृत्य करू लागतात. शिक्षक अचानक विद्यार्थ्यांकडे बघून विचित्र पद्धतीने डान्स करू लागतात. विचित्र आवाज करू लागतात. शिक्षक कधी हसताना, कधी ओरडताना तर कधी इतर विचित्र कृत्य करताना दिसत आहेत. एक विद्यार्थी त्यांचा व्हिडिओ गुपचूप काढत आहे. तसेच शिक्षक असे का करत आहेत हे अद्याप समजलेले नाही. व्हायरल व्हिडिओ कुठला आहे हे कळालेले नाही. मात्र हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हे देखील वाचा- पाऊस सुरू झाला म्हणून जोडपे धावत रिक्षात जाऊन बसले अन्…; पुढे जे झाले ते तुम्हीच पाहा
व्हायरल व्हिडिओ
Physics padhate padhate chadh gya bhoot 💀 pic.twitter.com/PrDbm1gqgs
— Vijay (@veejuparmar) September 26, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @veejuparmar अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओला ‘भौतिकशास्त्र शिकवत असताना, एक भूत त्यांच्या अंगात शिरले असे कॅप्शन दिले आहे. एक युजरने लिहिले आहे की, त्यांना कोणीतरी हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, सरांना झोंबीने चावले बहुतेक, तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, विद्यार्थ्यांचा विषय गेला आता, तर सरांमध्ये न्यूटनचा आत्मा आला असेही एकाने म्हटले आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे.