(फोटो सौजन्य: Instagram)
कुठे घडली ही घटना?
आम्ही तुम्हाला सांगतो की, थायलंड देशातील एका जोडप्याने हा अनोखा रेकाॅर्ड करुन दाखवला. आपल्या अतूट प्रमासाठी ओळखले जाणारे एक्काचाई आणि लक्षाना तिरनारत आता विभक्त झाले आहेत. बराच काळ सोबत घालवल्यानंतर त्यांनी एकमेकांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. या घटनेमुळे आता सोशल मिडियावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, 2013 मध्ये या जोडप्याने 58 तास, 35 मिनिटे आणि 58 सेकंद किस करत जगभरात एक नवीन रेकाॅर्ड तयार केला होता ज्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. त्यांनी स्वत:च त्यांचा 2011 सालचा 46 तास किस करत राहण्याचा रेकाॅर्ड मोडत हा नवीन रेकाॅर्ड तयार केला होता. आता, गिनिज वर्ल्ड बुकने नंतर जरी ही कॅटेगरी बंद केली असली तरी जोडप्याचा हा अनोखा रेकाॅर्ड मात्र लोकांच्या नेहमीच स्मरणात राहिला. आता बातमी समोर येत आहे की, आपल्या प्रेमासाठी ओळखले जाणारे हे जोडपे 2025 पासून वेगळे राहत आहेत. दोघांनीही सामंजस्याने आणि सहमताने हा निर्णय घेतला आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, इतके प्रेम आणि अनेक वर्षांपासून सोबत राहिल्यानंतरही दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. रिपोर्टनुसार, दोघे आजही एकमेकांचा आदर करतात आणि मिळून त्यांच्या मुलांना सांभाळत आहेत. त्यांच्या या कथेला ऐकून आता लोकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. अनेकांचं म्हणणं आहे की, जर इतकी वर्षे एकत्र राहिलेलं जोडपं जर वेगळं होऊ शकतं तर मग आपण प्रेमावर विश्वास कसा ठेवायचा? ही कथा खऱ्या अर्थाने सिद्ध करते की, जसं दिसतं तसं खरंच असतं असं नाही. बऱ्याचदा बाहेरुन चांगली दिसणारी प्रत्येक गोष्ट चांगली नसते तर वाईट दिसणारी गोष्ट नेहमीच वाईट असते असंही नाही.






