(फोटो सौजन्य: instagram)
तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही आजवर इथे अनेक व्हिडिओज व्हायरल झालेले पाहिले असतील. हे व्हायरल व्हिडिओज कधी आपल्याला हसवतात कधी थक्क करतात तर आधी आश्चर्यचकित करून सोडतात. आता नुकताच इथे एका लग्नसमारंभात एक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यातील हास्यापद दृश्ये तुम्हाला पोट धरून हसवेल. यात नवरदेव आपल्याच लग्नमंडपात असे काही करताना दिसतो की पाहून सर्वच आश्चर्यचकित होतात. हे तर जाऊद्याच यानंतर यावर नवरी जी प्रतिक्रिया देते ती पाहून तर तुम्ही खळखळून हसाल .
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो वधू-वराशी संबंधित आहे. यामध्ये वराने आपल्या वधूच्या बहिणीचे म्हणजेच वहिनीचे सेल्फी घेत असताना तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. हे दृश्य एका लग्न समारंभाचे आहे, जिथे वधू-वरांसोबतच काही पाहुणेही मंचावर उपस्थित होते. व्हिडिओमध्ये दिसत आहे की वधूची बहीण वराला शुभेच्छा देण्यासाठी तिच्याजवळ बसते आणि सेल्फी काढू लागते. पण पुढच्याच क्षणी वर असे काही करतो जे पाहून वधूलाही आश्चर्याचा धक्का बसतो.
केअरटेकरला पाहताच आनंदाने कुशीत जाऊन बसले सिंहाचे पिल्लू, गोड दृश्य कॅमेरात कैद; Video Viral
या संपूर्ण घटनेत वधूचा राग स्पष्टपणे दिसत असल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. वराने आपल्या वहिनीचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करताच, वधू लगेचच त्याला जोरदार चापट मारते आणि आपला राग व्यक्त करते. यांनतर वराचा चेहरा लाजेने लाल होतो आणि तो लगेच शांत होऊन आपल्या जागेवर बसला. पण यानंतरही वधुचा राग काही शांत होत नाही आणि ती संतापलेल्या नजरेने त्याच्याकडे बघत राहते. हा सर्व प्रकार पाहून मेव्हणीही यावेळी थक्क झाल्याचे दिसते आणि तिथे एक वेगळीच शांतता पसरते. सोशल मीडिया युजर्स मात्र या घटनेची चांगलीच मजा उचलत असून हा व्हिडिओ वेगाने शेअर करत आहेत.
लग्नसमारंभातील हा व्हिडिओ @bridal_lehenga_designn नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘आता कायच बोलणार’ असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे खूप हास्यापद आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “घरी गेल्यावर भावाची काही खैर नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.