India France Friendship : मुंबईत फ्रान्स अध्यक्ष मॅक्रॉन यांचा 'जय हो' चा नारा; भारताचे केले भरभरुन कौतुक (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी भारत-फ्रान्स इनोव्हेशन फोरममध्ये भारताच्या तंत्रज्ञान प्रगतीचे तोंडभरुन कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले की, भारत आता भारत नवोपक्रमात प्रगती करेल का नाही हा वादाचा विषय राहिला नसून, भारतासोबत नवाचार करण्यास कोण पुढे येईल हा प्रश्न उरला आहे. यासाठी फ्रान्स विश्वासार्ह आणि एक स्पष्ट उदाहरण असल्याचेही मॅक्रॉन यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी म्हटले की, भारताची तंत्रज्ञानिक प्रगती आत जागतिक स्तरावर मान्य केली जात आहे. यामुळे भारत आणि फ्रान्सचे संबंध जागतकि संतुलनासाठी अधिक महत्वपूर्ण असल्याचे मॅक्रॉन यांनी म्हटले.
मॅक्रॉन यंनी आपल्या भाषणात जगभरातील दिग्गज टेक कंपन्यांमध्ये नेतृत्व करणाऱ्या भारताच्या सीईओंचेही कौतुक केले. अल्फाबेट, मायक्रोसॉफ्ट, IBM, अॅडोब सारख्या दिग्गज कंपन्यांच्या नेतृत्वाचा उल्लेख केला. तसेच कोल्हापूरच्या रहिवासी आणि लक्झरी ब्रॅंड शनेलच्या सीईओ लीना नायर यांच्या यशाचेही कौतुक त्यांनी केली.
दरम्यान दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि अंतराळ सहकार्य वाढवण्यासाठी देखील चर्चा करण्यात आली. या चर्चेत दोन्ही देसांनी मिळून पुढील पिढीचे इंजिन आणि मल्टीलेयर हेलिकॉप्टर विसकसित करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय लढाऊ विमान आणि पाणबुड्यांच्या संयुक्त विकासात फ्रान्स प्रमुख भागीदार ठरला. दोन्ही देशांनी अंतराळ क्षेत्रातील सहकार्य मजबूत करण्यासाठी संयुक्त उपग्रह प्रकल्प द्वारे एकत्रित कराम करण्यास सहमती दिली. याशिवाय अणुउर्जा आणि सामान्य लोकांच्या जीवनात तंत्रज्ञानाच्या समावेशवारही सविस्तर चर्चा करण्यात आली.
मॅक्रॉन यांनी भारत आणि फ्रान्समध्ये विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी संबंध वाढवण्याचा संदेश त्यांनी आपल्या भाषणातून दिला. त्यांनी सांगितले की, दोन्ही देशांतील भागीदारी संरक्षण करारापर्यंत मर्यादित नसून दीर्घकालीन धोरणात्क सहकार्यावर आधारित आहे. त्यांनी आपल्या भाषणात जय होचा नाराही दिला.






