(फोटो सौजन्य: X)
मागील काही काळात भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहचला होता. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ला केला ज्यानंतर सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली खरी मात्र शेवटी दोन्ही देशांनी याला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. त्यातच आता यासंबंधीचा एक नवीन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात एक दहशतवादी आणि त्याच्या आईमधील संभाषण दिसून आले. सांगण्यात येते की, हा त्याचा शेवटचा कॉल होता ज्यात आईने आपल्या दहशतवादी मुलाला भारतीय सैन्याला शरण येण्याचे आवाहन केले मात्र मुलाने काही तिचे ऐकले नाही आणि हा व्हिडिओ त्याचा शेवटचा व्हिडिओ ठरला…
भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरु केले होते ज्यामध्ये अनेक दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. याकाळातच जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याचा मृत्यू झाल्याचा व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये तो त्याच्या आईशी व्हिडिओ कॉलवर बोलताना दिसत आहे, जिथे त्याची आई त्याला शरण येण्याची विनंती करत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या क्लिपबाबत असा दावा केला जात आहे की, नाझीर वाणी नावाचा हा दहशतवादी चकमकीपूर्वी त्याच्या आईशी बोलत आहे. त्याच्या हातात एके-४७ देखील आहे. व्हिडिओमध्ये, दहशतवाद्याची आई म्हणते, “शरणागती पत्कर.” ज्यांनंतर दहशतवादी त्याच्या आईच्या विधानाला उत्तर देत म्हणतो की, “सैन्य पोहोचू द्या, मग मी बघेन.”
मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी नझीर वाणी सैन्यापासून वाचण्यासाठी एका घरात लपला होता, जिथे तो त्याच्या कुटुंबाशी बोलला. मारण्यापूर्वी, दहशतवाद्याने त्याच्या आईशी तसेच दुसऱ्या दहशतवादी आसिफ अहमद शेखच्या बहिणीशी वार्ता केली. या चकमकीत नझीर आणि आसिफही दोघेही मारले गेले. मृत्यूआधीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर आता चांगलाच ट्रेंड करत आहे.
#terrorist killed in #Tral #Encounter was seen talking to his mother before the encounter #BREAKING #Encounter #terrorists #Nadar #Tral #pulwama #SouthKashmir #IndianArmy #Pakistan #PulwamaAttack #Pulwama
Aamir Nazir Wani Aamir’s mother is telling him to surrender but Aamir… https://t.co/a58CwlyrNw pic.twitter.com/zrbilW8BZ2
— Indian Observer (@ag_Journalist) May 15, 2025
जीवाशी खेळ! धावत्या ट्रेनमध्ये चढायला गेले अन् स्वत:सोबत दोघांना घेऊन पडले काका ; Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @ag_Journalist नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘चकमकीत ठार झालेला दहशतवादी चकमकीपूर्वी त्याच्या आईशी बोलताना दिसला’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत असून युजर्सने यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “त्यांना असे ब्रेनवॉश केले जाते की हूर स्वर्गात त्यांची वाट पाहत असतील.. हे व्हिडिओ रिलीज होऊ नयेत त्यामुळे त्यांचा मूर्खपणा आणखी वाढतो” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बरं झालं आतंकवादीला मारून टाकलं”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.